मुळशी धरणात पाेहण्यासाठी उतरलेले विद्यार्थी बुडाले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2019 13:50 IST2019-05-02T13:45:57+5:302019-05-02T13:50:55+5:30
मुळशी धरण परिसरात सहलीसाठी आलेले भारती विद्यापीठामध्ये एमबीएचे तीन विद्यार्थी बुडाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.

मुळशी धरणात पाेहण्यासाठी उतरलेले विद्यार्थी बुडाले
वडगाव मावळ : मुळशी धरण परिसरात सहलीसाठी आलेले भारती विद्यापीठामध्ये एमबीएचे तीन विद्यार्थी बुडाल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. मुळशी तालुक्यातील वळणे गावात ही घटना घडली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. तीनही विद्यार्थ्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
संगीता नेगी (कोथरुड, मुळ दिल्ली), शुभम राज सिन्हा (वय. २२, मुळ पटना बिहार), शिवकुमार (वय २१, रा. मुळ उत्तरप्रदेश) अशी तिघांची नावे आहेत. भारती विद्यापीठामध्ये एमबीएचे शिक्षण घेणारा ग्रुप मुळशी परिसरात आज सकाळी सहलीसाठी आले होते. सकाळी सात वाजता यातील काही जण वळणे गावाजवळ धरणात पोहण्यासाठी उतरले होते. त्यावेळी त्यातील २ मुले आणि १ मुलगी धरणात बुडाली. याची माहिती पौड पोलिसांना देण्यात आली. पौड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आपत्ती व्यवस्थापनाचे पथक रवाना झाले. पुणे महानगर विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाच्या जवानांना तीनही मृतदेह बाहेर काढण्यात यश आले आहे.
पुढील तपास पाैड पाेलीस करत आहेत.