शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
2
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
3
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
4
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
5
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
6
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
7
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
8
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
9
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
10
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
11
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
12
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
13
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
14
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
15
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
16
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
17
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला
18
राज ठाकरेंना मिळणार खास मान...यंदाचा शिवसेनेचा 'दसरा मेळावा' ठाकरे बंधू गाजवणार?
19
जीएसटी कमी झाल्यानंतर, किती रुपयांवर येईल Maruti Baleno? किती रुपयांचा होईल फायदा? जाणून घ्या
20
जगातील सगळ्यात महागडी शाळा; वर्षाची फी तब्बल १,१३,७३,७८० रुपये! आहे तरी कुठे नक्की?

पुरंदरच्या शिक्षण विभागाचा अजब कारभार; कार्यशाळेच्या नावाखाली कागदोपत्री फार्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2025 20:37 IST

शिक्षकांना माहिती दिली केवळ एक दिवस अगोदर; ४३६ पैकी ६ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपस्थित

जेजुरी : पुरंदर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे ३ सप्टेंबर रोजी महात्मा फुले माध्यमिक विद्यालय, शिवरी येथे शैक्षणिक गुणवत्ता विकास कार्यक्रमांतर्गत मुख्याध्यापक आणि शाळा व्यवस्थापन समिती (एसएमसी) अध्यक्षांसाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र, या कार्यशाळेच्या आयोजनात गंभीर त्रुटी आणि कागदोपत्री फार्स उघडकीस आला आहे.शिक्षण विभागाने कार्यशाळेची माहिती केवळ एक दिवस अगोदर दिली होती. सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत कार्यशाळा होणार असल्याचे पत्रात नमूद होते. मात्र, प्रत्यक्षात याच वेळेत शैक्षणिक गुणवत्ता विकास, तंबाखूमुक्त कार्यशाळा आणि नवसाक्षरता कार्यक्रमाचे प्रशिक्षण अशा तीन वेगवेगळ्या कार्यशाळा घेण्यात आल्या. सकाळी ११ ते दुपारी १ या दोन तासांत तीन प्रशिक्षणे घेतल्याचा दावा करण्यात आला, ज्यामुळे शिक्षण विभागाच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

पुरंदर तालुक्यातील २१८ शाळांसाठी आयोजित या कार्यशाळेत २१८ शिक्षक आणि २१८ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष किंवा सदस्य अशा एकूण ४३६ जणांना प्रशिक्षण देण्याचा दावा करण्यात आला. प्रत्यक्षात, केवळ ६ शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष उपस्थित होते, तर अनेक शिक्षकही अनुपस्थित होते. तरीही, अनुपस्थित व्यक्तींच्या उपस्थितीची खोटी नोंद हजेरीपटावर करण्यात आली. यामुळे कार्यशाळा केवळ कागदोपत्री दाखवण्यासाठी आयोजित केल्याचा संशय निर्माण झाला आहे.

विद्यार्थ्यांचे नुकसानशिवरी हायस्कूलमध्ये शाळा सुरू असतानाही ही कार्यशाळा घेण्यात आली. शाळेच्या वेळेत अशा कार्यशाळा घेऊ नयेत, याबाबत वारंवार सूचना आणि पत्रव्यवहार करूनही शिक्षण विभागाकडून अंमलबजावणी होत नाही. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. कार्यशाळेदरम्यान अनेक शिक्षक बाहेर फिरत होते, तर काहीजण निघून गेले होते.निधी लाटण्याचा संशयएकाच वेळी तीन कार्यशाळा दाखवून त्या वेगवेगळ्या दिवशी झाल्याचा अहवाल तयार करून निधी लाटण्याचा प्रकार होत असल्याची शंका निर्माण झाली आहे. याबाबत डाएटचे ज्येष्ठ अधिव्याख्याते डॉ. क्षीरसागर यांनी बोलण्यास नकार दिला. तर गटशिक्षणाधिकारी वैभव डुबल हे बैठकीला गेल्याचे सांगितले.शिक्षण विभागाच्या विश्वासार्हतेवर प्रश्नगुणवत्ता विकासाच्या नावाखाली खोटे अहवाल सादर करणे आणि कागदोपत्री फार्स करणे हे शैक्षणिक विश्वाचा विश्वास डळमळीत करणारे आहे. शिक्षण विभागाने पारदर्शकता आणि जबाबदारी दाखवून विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देण्याची गरज आहे.मार्गदर्शनाचा अभावकार्यशाळेत डाएटचे ज्येष्ठ अधिव्याख्याते डॉ. प्रभाकर क्षीरसागर, निपुण पुणे मॉडेल स्कूलच्या जिल्हा परिषद समन्वयिका श्रेया बॅनर्जी आणि मुख्यमंत्री फेलोशिप जिल्हा परिषदेचे चेतन भालके यांनी मार्गदर्शन केले. मात्र, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष आणि सदस्यांना शाळेच्या वार्षिक विकास आराखड्याचा खर्च, निधीचा उपयोग, शासकीय योजनांचा वापर, विद्यार्थ्यांचे हक्क, मोफत व सक्तीचे शिक्षण हक्क (RTE), विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंबंधी नियम, शाळा सोडून जाण्यापासून प्रतिबंध, गुणवत्ता सुधारणा, शिक्षक-पालक समन्वय आणि विद्यार्थ्यांच्या उपस्थिती-गुणवत्तेवर लक्ष देण्याबाबत आवश्यक मार्गदर्शन मिळाले नाही. कार्यशाळेला शिक्षण अधिकारी गोविंद लाखे, राजेंद्र कुंजीर, केंद्रप्रमुख राजेंद्र अद्वैत, प्रवीण इंदलकर, जितेंद्र कुंजीर, सुरेखा कामथे, विषयतज्ज्ञ भरत जगदाळे, दीपक पाटील आदी उपस्थित होते.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडTeacherशिक्षकEducationशिक्षण