शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

पिंपळे साैदागरमध्ये विचित्र अपघात ; आयटीयन्स अडकले वाहतूककोंडीत

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2018 4:58 PM

बारपेक्षा जास्त उंचीचा ट्रेलर पिंपळे साैदागर येथील साई चाैकातील ४५ मीटर रस्त्यावर लावण्यात अालेल्या लाेखंडी बारच्या खालून नेण्याचा प्रयत्न एका चालकाने केला. परिणामी ट्रेलर धडकल्याने हा लोखंडी बार तुटला. तुटलेला लोखंडी बार ट्रेलरमध्ये अडकला. त्यामुळे पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला.

रहाटणी : रहाटणी - पिंपळे सौदागर येथील साई चौकामध्ये मागील काही वषार्पासून उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे शिवार चौकाकडून वाकडकडे जाताना ४५ मीटर रस्त्यावर लोखंडी बार लावण्यात आला आहे. त्यामुळे ठराविक उंचीचीच वाहने येथून जाऊ शकतात. असे असतानाही या बारपेक्षा जास्त उंचीचा ट्रेलर येथून नेण्याचा प्रयत्न एका चालकाने केला. परिणामी ट्रेलर धडकल्याने हा लोखंडी बार तुटला. तुटलेला लोखंडी बार ट्रेलरमध्ये अडकला. त्यामुळे पूर्ण रस्ता वाहतुकीसाठी बंद झाला. सकाळी कामावर जाण्याची वेळ असल्याने हिंजवडीकडे निघालेल्या आयटीयन्सना अपघाताचा फटका बसला. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागून आयटीयन्स या कोंडीत अडकले होते.

    पिंपळे सौदागर येथील साई चौकामध्ये उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे शिवार चौक ते साई चौकाच्या दरम्यान वाकडकडे जाण्याच्या मार्गावर जास्त उंचीचे वाहने जाऊ नयेत म्हणून लोखंडी बार लावण्यात आले होते. या लोखंडी बारला सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एक ट्रेलर धडकला. दोन जुन्या ट्रकच्या च्यासी या ट्रेलरमध्ये होत्या. ट्रेलरचालकाला उंचीचा अंदाज न आल्याने ट्रेलर लोखंडी बारला धडकला. यात लोखंडी बार तुटून  ट्रेलरवर कोसळला. परिणामी ट्रेलर लोखंडी बारमध्ये अडकला. त्यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. या अपघातानंतर ट्रेलरचालक पसार झाला.    

    साई चौकातील उड्डाणपुलाचे काम सुरू असल्याने डांगे चौकाकडून येणारी वाहतूक शिवाजी चौकातून वळवण्यात आलेली आहे. त्यामुळे या मार्गावर वाहतूक कोंडी असते. त्यात ट्रेलरचा अपघात झाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहतूक सुरळीत करण्यासाठी स्थानिकांसह वाहतूक पोलिसांची तारांबळ झाली. शिवार चौकाकडून पुण्याकडे जाणारे व हिंजवडी आयटी पार्ककडे जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी असते. त्याच वेळेस या ट्रेलरला अपघात झाला. अपघातग्रस्त ट्रेलर क्रेनच्या साह्याने रस्त्याच्या कडेला घ्यायचे म्हटले तर या ट्रेलरवर असणाऱ्या दोन जुन्या ट्रकच्या चाचीस खाली पडण्याची शक्यता होती. त्यामुळे हा ट्रेलर बाजूला कसा करावा हा मोठा प्रश्न वाहतूक पोलिसांसमोर होता. पोलिसांनी बीआरटीएस मार्गामधून वाहतूक सुरू केली. त्यामुळे सकाळी साडेदहानंतर वाहतूक सुरळीत होण्यास मदत झाली. 

अनेकांचे प्राण वाचलेअपघातग्रस्त ट्रेलरच्या मागे व पुढे अनेक वाहने होती. ट्रेलर चालकाच्या चुकीमुळे व अंदाज न आल्याने चालकाने हा ट्रेलर लोखंडी बारच्या खालून वेगात घातला. मात्र लोखंडी बार तुटला जर हा ब्रॅकेट ट्रेलरच्यावर आणला नसता तर ट्रेलरच्या पाठीमागून येणाऱ्या अनेक वाहनांना अपघात झाला असता व यात अनेकांना आपला प्राण गमवावा लागला असता. मात्र सुदैवाने वेळेतच सर्वांनी दक्षता घेतल्यामुळे अनेकांना आपले प्राण वाचवता आले.

टॅग्स :Accidentअपघातpimpale saudagarपिंपळे सौदागरTrafficवाहतूक कोंडी