Pimpri Chinchwad | पाकीट चोरताना रोखले, थेट कोयत्यानेच वार; बावधनमधील सर्व्हिस रोडवरील घटना
By रोशन मोरे | Updated: April 3, 2023 18:20 IST2023-04-03T18:20:29+5:302023-04-03T18:20:44+5:30
पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल केला...

Pimpri Chinchwad | पाकीट चोरताना रोखले, थेट कोयत्यानेच वार; बावधनमधील सर्व्हिस रोडवरील घटना
पिंपरी : तरुण फोनवर बोलत असताना खिशात हात घालून पैशाचे पाकीट काढून मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न तीन चोरट्यांनी केला. तरुणाने त्याला विरोध केला असता चोरट्यांनी लोखंडी कोयता हातावर मारून तरुणाची दुचाकी हिसकावून पळ काढला. ही घटना रविवारी (दि.२) सायंकाळी सहाच्या सुमारास बावधनमधील सर्व्हिस रोडवर घडली. या प्रकरणी यश नागेश मळगे (वय ३०, रा. कोथरुड) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात तीन चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे फोनवर बोलत असताना आरोपींनी मोबाइल हिसकावण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने त्याला प्रतिकार केला असता त्याला कोयत्याने वार करून जखमी करून फिर्यादीची दुचाकी हिसकावून त्या गाडीवरून पळ काढला, असे फिर्यादीत नमूद केले आहे.