खंडणीसाठी दगडफेक करून दहशत, चिखलीतील साने चौकातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 13:10 IST2024-03-26T13:09:59+5:302024-03-26T13:10:31+5:30
पिंपरी : दुकानात जाऊन धमकी देत दगडफेक केली. धंदा करायचा असल्यास दर महिन्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे ...

खंडणीसाठी दगडफेक करून दहशत, चिखलीतील साने चौकातील घटना
पिंपरी : दुकानात जाऊन धमकी देत दगडफेक केली. धंदा करायचा असल्यास दर महिन्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील, असे म्हणून खंडणी मागितली. चिखलीतील साने चौकात शनिवारी (दि. २३) ही घटना घडली. शुभम धनंजय नाकील (२६, रा.निगडी) यांनी या प्रकरणी रविवारी (दि. २४) चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. बापू कांबळे याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शुभम यांचे साने चौकात भागीदारीमध्ये मोबाइल दुकान आहे. दुकानात शनिवारी कामगार होते. त्यावेळी संशयित बापू कांबळे आला. ‘मी मर्डर करून जेलमधून बाहेर आलोय. धंदा करायचा असेल, तर मला महिन्याला पाच हजार रुपये द्यावे लागतील,’ असे बापू कांबळे दुकानातील कामगाराला म्हणाला. त्याने दगडफेक केली. दरम्यान, फिर्यादी शुभम तेथे आले असता, संशयिताने त्यांनाही जीवे मारण्याची धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली.