उसने दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून पिंपरी-चिंचवडमध्ये कोयत्याने वार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 17:55 IST2022-03-04T17:51:33+5:302022-03-04T17:55:01+5:30

पैसे परत मागितल्याच्या रागातून कोयत्याने वार...

stabbed out of anger for asking for money latest crime news | उसने दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून पिंपरी-चिंचवडमध्ये कोयत्याने वार

उसने दिलेले पैसे मागितल्याच्या रागातून पिंपरी-चिंचवडमध्ये कोयत्याने वार

पिंपरी : उसने दिलेले पैसे परत मागितल्याच्या रागातून एकावर कोयत्याने वार केले. ‘माझ्या घरी पैसे मागायला परत यायचे नाही,’ असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. ही घटना आळंदी-मरकळ रस्त्यावर घडली. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात अभिराज जोखुराम कोरी (वय २८, रा. हरगुडे वस्ती, चिखली) यांनी फिर्याद दिली.
राजू पगारे, रतन ऊर्फ विकी काळे, कान्हा राजपूत, दया उर्फ दयाराम मारवाडी, नाथाराम चौधरी (वय ३९, रा. चाकण) यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कोरी यांनी आरोपी राजपूत यांना दहा हजार रुपये उसने दिले होते. उसने पैसे परत मागण्यासाठी फिर्यादी आरोपी यांच्या घरी गेले होते. त्याचा राग येऊन आरोपी कान्हा राजपूत याने अभिराज कोरी यांना हाताने मारहाण केली.

तसेच राजू पगारे, रतन उर्फ विक्की काळे यांनी फिर्यादीवर कोयत्याने वार केले. त्यानंतर बळजबरीने पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट गाडीत घालून मरकळ येथील दारूभट्टीवर घेऊन जाऊन परत मारहाण केली. माझ्या घरी परत पैसे मागायला यायचे नाही म्हणून परत लाथाबुक्क्यांनी मारहाण व कोयत्याने वार केले.

Web Title: stabbed out of anger for asking for money latest crime news