Pune: मेगाब्लॉकमुळे रविवारी पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या काही लोकल गाड्या रद्द 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2023 12:41 IST2023-12-09T12:40:41+5:302023-12-09T12:41:14+5:30

तसेच एमजीआर चेन्नई -लोकमान्य टिळक टर्मिनस (गाडी क्र.१२१६४) मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस साडेतीन तास उशीराने धावणार आहे...

Some local trains running between Pune and Lonavala on Sunday have been canceled due to megablock | Pune: मेगाब्लॉकमुळे रविवारी पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या काही लोकल गाड्या रद्द 

Pune: मेगाब्लॉकमुळे रविवारी पुणे ते लोणावळा दरम्यान धावणाऱ्या काही लोकल गाड्या रद्द 

पिंपरी :पुणे-लोणावळा मार्गावर इंजीनियरिंग आणि तांत्रिक कामांकरीता रविवार (दि. १०) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे काही लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच एमजीआर चेन्नई -लोकमान्य टिळक टर्मिनस (गाडी क्र.१२१६४) मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेस साडेतीन तास उशीराने धावणार आहे.

पुण्याहून लोणावळ्याकडे जाणाऱ्या रद्द गाड्या
 १. पुण्याहून लोणावळ्यासाठी सकाळी ९.५७, ११.१७ दुपारी ३.०० आणि सायंकाळी ४.२५, ६.०२ वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
 २) शिवाजीनगरहून तळेगाव करीता दुपारी ३.४७, ५.२० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

 लोणावळ्याहून पुणेकडे जाणाऱ्या रद्द गाड्या 
१. लोणावळ्याहून शिवाजीनगर करीता सकाळी १०.०५, सायंकाळी ५.३०, ६.०८, ७.३५ वाजता सुटणारी लोकल  रद्द राहील.
२. लोणावळ्याहून पुणेसाठी दुपारी २.५०, सायंकाळी ७.००  वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.
३. तळेगाव येथून पुणेसाठी सायंकाळी ४.४० वाजता सुटणारी लोकल रद्द राहील.

Web Title: Some local trains running between Pune and Lonavala on Sunday have been canceled due to megablock