...म्हणून सुरक्षारक्षकाने केली तब्बल १३ रिक्षांची तोडफोड; वाकडमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2021 17:20 IST2021-06-11T16:33:31+5:302021-06-11T17:20:49+5:30
वाकड परिसरातील म्हातोबानगर येथे सुरक्षारक्षकाने तब्बल १३ रिक्षांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे...

...म्हणून सुरक्षारक्षकाने केली तब्बल १३ रिक्षांची तोडफोड; वाकडमधील घटना
पिंपरी: पिंपरी चिंचवड शहर व परिसरात वाहनचोरी, तोडफोडीच्या गुन्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाकड परिसरातील म्हातोबानगर येथे सुरक्षारक्षकाने तब्बल १३ रिक्षांची मोठ्या प्रमाणात तोडफोड केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. गुरुवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. याप्रकरणी सुरक्षा रक्षक किरण घाडगे याला वाकडपोलिसांनी अटक केली आहे.
वाकड भागातील म्हातोबानगरमध्ये नव्यानेच बांधण्यात आलेल्या कॉम्प्लेक्ससमोर रिक्षा चालक रिक्षा उभी करतात.याबाबत त्यांना वेळोवेळी येथे रिक्षा उभी करून नका असे सांगितले होते. मात्र याकडे दुर्लक्ष करत हे रिक्षाचालक त्याच ठिकाणी रिक्षा अभीर करत होते. त्यांच्यापैकीच काहीजण तिथेच लघुशंका देखील करीत होते. याच रागातून या सुरक्षा रक्षकाने हे कृत्य केल्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
गुरुवारी मध्यरात्री आरोपी सुरक्षारक्षक घाडगे याने मद्यपान केल्यानंतर दगडाने रिक्षांची तोडफोड केली. यात जवळपास १३ रिक्षांचा समावेश आहे. या घटनेनंतर पोलिसांनी या आरोपी घाडगेला अटक केली आहे. कॉम्प्लेक्ससमोर रिक्षा उभ्या करू नका असे वारंवार बजावून देखील ऐकत नसल्याने रिक्षा फोडल्याची त्यांनी पोलिसांना सांगितले.