शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर काही वेळातच युद्धाची ठिणगी! होर्मुझमध्ये अंदाधुंद फायरिंग
2
‘आपले सर्व शेजारी चांगले, फक्त एक...', राजनाथ सिंह यांचा जर्मनीतून पाकिस्तानवर निशाणा
3
Top Marathi News LIVE Updates:खरातच्या अकाउंटला बोगस खात्यांतून कोट्यवधी रुपये ट्रान्सफर
4
“धडा शिकवायची हीच योग्य वेळ”; रिक्षावाल्यांना मराठी अनिवार्य निर्णय, मनसेचा नवा उपक्रम
5
Vidhan Parishad: विधान परिषद उमेदवार निवडताना भाजपची होणार तारेवरची कसरत 
6
ऑनलाईन ५० iPhone ची ऑर्डर, पण घरी आला नाही एकही फोन; ३५ लाखांची मोठी फसवणूक
7
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
8
अहमदाबाद विमान अपघातात पत्नी आणि मुलीला गमावलेल्या भारतीय व्यक्तीला धक्का, ब्रिटन सोडण्याचे आदेश
9
भयंकर ! वर्गाबाहेर पडताच झाला वाद, आठवीमधील विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या डोळ्यात खुपसला कंपास
10
बस्स.. आता संबंध संपला..! विराट कोहलीने घेतला मोठा निर्णय, कोर्टाच्या आदेशाने 'विषय संपला'
11
₹५०० रुपयांची नोट छपण्यासाठी किती येतो खर्च, कुठे छापल्या जातात नोटा; RBIनं दिली रंजक माहिती
12
STचे मोठे पाऊल! अभिनेता रितेश देशमुख-जेनेलिया देशमुख होणार ब्रँड अँबेसेडर, ५ वर्षांसाठी करार
13
"५० हजार द्यायचा, तरीही माझ्या मुलाला मारलं"; निळ्या ड्रममध्ये टाकलेल्या सौरभच्या आईचा टाहो
14
सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ; आणखी महागणार का Gold? पाहा काय आहेत आजचे लेटेस्ट दर?
15
Ashok Kharat : भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी मोठ्या हॉटेल व्यावसायिकाची तब्बल ६ तास चौकशी
16
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
17
Ganga Saptami 2026: सौभाग्याची 'गंगा' येईल तुमच्या दारी! २३ एप्रिल रोजी गंगा सप्तमीला करा 'हे' विशेष विधी
18
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
19
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
20
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
Daily Top 2Weekly Top 5

सहा वर्षांची सक्तमजुरी

By admin | Updated: September 1, 2015 04:04 IST

किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यास ६ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली.

पुणे : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यास ६ वर्षे सक्तमजुरी आणि २ हजार रुपये दंडाची शिक्षा न्यायालयाने सुनावली. दत्तू नामदेव शिंदे (वय ३८, रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी) असे शिक्षा झालेल्याचे नाव आहे. अतिरिक्त सत्र न्यायाधीश आर. आर. एच. मोहम्मद यांनी हा आदेश दिला आहे. राजेंद्र भरतू चरण (वय ४२, रा. आंबेडकर कॉलनी, पिंपरी) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांची पत्नी लक्ष्मी चरण (वय ३८) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली होती. १ आॅक्टोबर २००९ रोजी पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयाजवळील स्मशानभूमीजवळ हा प्रकार घडला होता. शिंदे व चरण कुटुंबीय एकाच कॉलनीत शेजारी राहतात. त्यांच्यात किरकोळ कारणांवरून नेहमीच वाद होत होते. दत्तूची व आरोपीची पत्नी छाया शिंदे या नळावर पाणी भरण्यासाठी गेल्या होत्या. या वेळी लक्ष्मी चरण यांनी भिंतीवर वाळत घातलेल्या साडीतून नळावरील बादलीत पाण्याचे काही थेंब पडले. यावरून दोघींमध्ये वाद सुरू झाला. या वेळी फिर्यादी व राजेंद्र शिंदे त्यांना समजावत होते. मात्र, रागावलेल्या दत्तूने राजेंद्र यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यांच्या तोंडावर जोरजोरात लाथा मारल्या. यातच ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण उपचार सुरू असतानाच दि. ४ आॅक्टोबर २००९ रोजी त्यांचा मृत्यू झाला. मारहाण झाल्यानंतर आरोपीवर भादवि ३०७ (खुनाचा प्रयत्न) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. पण, राजेंद्र यांचा मृत्यू झाल्यानंतर कलम ३०२ (खून) लावण्यात आले. मात्र, न्यायालयाने ३०४ (२) हे सदोष मनुष्यवधाचे कलम लावून दत्तू दोषी ठरवून ६ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. संदीप वाघ यांनी १२ साक्षीदार तपासले. (प्रतिनिधी)