धक्कादायक! भावाच्या उपचारासाठी पैसे देत दिराकडून वहिनीवर अत्याचार
By रोशन मोरे | Updated: June 5, 2023 14:21 IST2023-06-05T14:21:00+5:302023-06-05T14:21:44+5:30
आरोपी दिराला अटक करण्यात आली...

धक्कादायक! भावाच्या उपचारासाठी पैसे देत दिराकडून वहिनीवर अत्याचार
पिंपरी : नवऱ्याच्या उपचारासाठी महिलेला चुलत दिराने पैसे दिले. ते पैसे परत न करू शकल्याचा फायदा घेत दिराने वहिनेवर अत्याचार केला. ही घटना मागील चार महिन्यापांपासून ते तीन जून २०२३ या कालावधीत ताथवडे येथे घडली. या प्रकरणी महिलेने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार आरोपी दिराला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी आपल्या पतीच्या उपचारासाठी चुलत दिराकडून एक लाख रुपये घेतले होते. ते पैसे परत देऊ शकल्या नाहीत. त्याचा फायदा घेत आरोपीने त्यांना खरेदी करण्याच्या बहाण्याने ताथवडे येथील लाजवर बोलवून घेतले. तेथे आरोपीने फिर्यादीच्या मनाविरुद्ध वारंवार जबरदस्तीने अत्याचार केला.