अनैतिक संबंधाच्या कारणावरून मेहुण्याने केला दाजीचा खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2020 19:09 IST2020-02-10T18:53:55+5:302020-02-10T19:09:28+5:30

मोहन यांच्या घराजवळ राहणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते.

sister husband murdred by brother from Immoral relationship | अनैतिक संबंधाच्या कारणावरून मेहुण्याने केला दाजीचा खून

अनैतिक संबंधाच्या कारणावरून मेहुण्याने केला दाजीचा खून

पिंपरी :  मेहुण्याने दाजीवर कोयत्याने वार करून खून केल्याची घटना सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास धावडे वस्ती, भोसरीत उघडकीस आली आहे. मोहन बाबुराव लेवडे (वय ४५. रा. धावडे वस्ती, भोसरी) असे खून झालेल्या तरूणाचे नाव आहे. अनैतिक संबंधाच्या कारणावरून खूनाचा प्रकार घडला आहे.
भोसरी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विष्णू मुंजाजी जगाडे (वय ३०, रा.जरी, ता.जि.परभणी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला असून जगाडेला अटक केली आहे. मोहन यांचे घराजवळ राहणाऱ्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते. यावरून पती-पत्नीमध्ये भांडणे होत असत. तसेच मोहन घटस्फोटाची मागणी करीत होता. मोहन यांचा मेहुणा भांडणे सोडवायला आला होता. रविवारी रात्री मोहन आणि विष्णू दोघेजण घराच्या टेरेसवर दारू पित बसले होते. विष्णूने मोहन यांना पुन्हा समजावण्याचा प्रयत्न केला. मात्र, मोहन आपल्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे चिडलेल्या विष्णूने लोखडी कोयत्याने वार केले. त्यात मोहनचा मृत्यू झाला. त्यानंतर विष्णूने पोलीस नियंत्रण कक्षाला दूरध्वनी करून घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी विष्णूला ताब्यात घेतले.

Web Title: sister husband murdred by brother from Immoral relationship