सिंहगड मह‍विद्यालयात विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2018 20:59 IST2018-03-26T20:59:47+5:302018-03-26T20:59:47+5:30

लोणावळ्याजवळील कुसगाव गावात असलेल्या सिंहगड अभियांत्रिकी मह‍विद्यालयाच्या हाॅस्टेलमध्ये एका विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

Sinhagad college student committed Suicide | सिंहगड मह‍विद्यालयात विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

सिंहगड मह‍विद्यालयात विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या

लोणावळा - लोणावळ्याजवळील कुसगाव गावात असलेल्या सिंहगड अभियांत्रिकी मह‍विद्यालयाच्या हाॅस्टेलमध्ये एका विद्यार्थ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.
      प्रतीक अरुण वर्पे (वय 20, मूळ राहणार वारुळवाडी नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे) असे या गळफास घेतलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. सध्या तो सिंहगड मह‍विद्यालय‍च्या राजगड या हाॅस्टेलच्या रुम नं. 35 मध्ये मित्रांच्या सोबत रहात होता. रविवारी रात्री रुममधील मित्र झोपलेले असताना अज्ञात कारणावरुन प्रतिक याने फॅनला नायलाॅनची दोरी बांधत गळफास घेतला. सकाळी मित्र झोपेतून उठल्यानंतर सदरचा प्रकार उघडकिस आला. याप्रकरणाची खबर प्रतिकचा मित्र लौकिक राजेंद्र लौंध याने लोणावळा ग्रामीण पोलीसांना दिली.  याप्रकरणी लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अजित ननावरे घटनेचा तपास करत आहेत.

Web Title: Sinhagad college student committed Suicide