धक्कादायक! वाहनांची तोडफोड करून तरुणीवर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2020 15:49 IST2020-02-05T15:47:39+5:302020-02-05T15:49:31+5:30

तरुणीकडे शारीरिक सुखाची मागणी करून आरोपीने मनास लज्जा उत्पन्न होईल असे केले कृत्य

Shocking! Threatening to youth girl put acid and break the vehicles | धक्कादायक! वाहनांची तोडफोड करून तरुणीवर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी

धक्कादायक! वाहनांची तोडफोड करून तरुणीवर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी

ठळक मुद्देपिंपळे गुरव येथील घटना : सांगवी पोलिसांकडून आरोपी तरुणाला अटक२४ वर्षीय तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात दिली फिर्याद

पिंपरी : तरुणीचा पाठलाग करत तिच्या घरासमोरील वाहनांची तोडफोड केली. त्यानंतर तिच्या आईवडिलांना शिवीगाळ केली. तसेच तरुणीच्या अंगावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकी दिली. पिंपळे गुरव येथे मंगळवारी (दि. ४) हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी आरोपी तरुणाला सांगवी पोलिसांनीअटक केली आहे.
याप्रकरणी २४ वर्षीय तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, सागर सतीश दीक्षित (वय २८, रा. पिंपळे गुरव) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी तरुणीचा वारंवार पाठलाग करत शिवीगाळ करून मारहाण केली. तरुणीकडे शारीरिक सुखाची मागणी करून आरोपीने मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. मंगळवारी आरोपी सागर हा पीडित तरुणीच्या घराजवळ गेला. तरुणीच्या घराबाहेर तरुणीच्या गाड्यांची आरोपी याने तोडफोड केली. तसेच तरुणीच्या आईवडिलांना शिवीगाळ केली. तुला मारीन, तुमचे हॉटेल बंद करीन, अशी धमकी देत तरुणीच्या अंगावर अ‍ॅसिड टाकण्याची धमकीही आरोपी सागर याने दिली. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: Shocking! Threatening to youth girl put acid and break the vehicles