शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

धक्कदायक ! गुप्तधन, पुत्रप्राप्तीच्या आमिषाने भोंदूबाबाकडून पाच तरुणींचे लैंगिक शोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2020 11:46 IST

पिंपरी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मुलन व जादुदोणा प्रतिबंध कायदा तसेच पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.  हा प्रकार पिंपरीतील नेहरुनगरमध्ये २२ जानेवारीपासून २१ फेबु्रवारीपर्यंत सुरु होता. या कुटुंबातील एका २२ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.

ठळक मुद्दे रायगडच्या भोंदुबाबाला अटक,  अंधश्रद्धा निर्मुलन समितीने आणला उघडकीसगुप्तधन, पुत्रप्राप्तीच्या आमिषाने भोंदूबाबाकडून पाच तरुणींचे लैंगिक शोषण

पुणे :पुत्राचा हव्यास आणि गुप्तधनाची आस यामुळे एक कुटुुंंब भोंदुबाबाच्या आमिषाला बळी पडले. त्यातून या भोंदुबाबाने भिती दाखवून कुटुंबातील ५ तरुणींचे लैंगिक शौषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावर कडी म्हणजे त्याने त्यांच्यातील एका तरुणीबरोबर स्वत:चे अगोदर लग्न झाले असतानाही दुसरे लग्न केले आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे.

सोमनाथ कैलास चव्हाण (वय ३२, रा. खैरेवाडी, ता़ रोहा़ जि़. रायगड) असे या भोंदुबाबाचे नाव आहे. पिंपरी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मुलन व जादुदोणा प्रतिबंध कायदा तसेच पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.  हा प्रकार पिंपरीतील नेहरुनगरमध्ये २२ जानेवारीपासून २१ फेबु्रवारीपर्यंत सुरु होता. या कुटुंबातील एका २२ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.याबाबत पोलिसांनी सांगितले की, सोमनाथ चव्हाण याने या कुटुंबास सांगितले की, तुमच्या घरामध्ये पुत्र प्राप्ती होऊ नये, म्हणून घरातील प्रत्येक सदस्यावर त्यांच्या नात्यातील बाईने करणी केली आहे. तुमच्या घरातील एका रुममध्ये गुप्त धन आहे. त्यामध्ये सात पेट्या धन, एक सोन्याची घागर, एक गणपतीची मुर्ती असा खजिना आहे. तुमच्या घरातील एका मुलीचा जीव धोक्यात आहे. तुम्हाला पुत्र प्राप्ती होण्यासाठी व गुप्तधन मिळविण्यासाठी आणि या मुलीचा जीव वाचविण्यासाठी त्याने तुमच्या घरात तीन उतारे व नग्न पुजा करावी लागेल, असे सांगितले. त्यासाठी ३ लाख रुपये खर्च येईल व मला ११ हजार रुपये दक्षिणा द्यावी लागेल़ तसे सांगितले. ते तीन उतारे तुम्ही १५ दिवसामध्ये सुरु केले नाही तर तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या जीवीतास खूप मोठा धोका आहे, अशी भीती या कुटुंबाला दाखविली. या सर्व प्रकाराने हे कुटुंब घाबरुन गेले. त्यांनी या पुजेला संमती दर्शविली. त्यानंतर त्याने एक दिवस रात्रीच्या वेळी या फिर्यादीच्या पाच बहिणींना उतारा करण्याच्या बहाण्याने रुममध्ये घेऊन दार बंद केले. त्यांना त्यांच्या अंगावरील सर्व कपडे काढून पांढऱ्या कपड्यावर झोपायला लावले. त्यानंतर त्याने लिंबु चिरुन त्याचा रस त्यांच्या अंगावर चोळला. अवघड जागी तो टाकला. त्यानंतर अश्लिल कृत्य केले. त्यांच्यातील एका बहिणीवर त्याने बलात्कार केला. त्यानंतर त्यांना बाहेर कोणाला काही सांगितले तर मी तुमच्या आई वडिलांना माझ्या दैवी शक्तीने व काळ्या जादूने मारुन टाकीन अशी भितीदायक धमकी दिली. त्यामुळे त्यांनी ही बाब तेव्हा कोणाला सांगितली नाही. २१ फेबु्रवारी रोजी त्याने तिसऱ्यावेळी उतारा काढतेवेळी त्यांच्यातील एका बहिणीवर तीनदा बलात्कार केला. तसेच त्याचे पूर्वी लग्न झाले असतानाही फिर्यादीच्या बहिणीबरोबर लग्न केले.या प्रकाराची माहिती अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांच्या मदतीने या तरुणीने पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

टॅग्स :RaigadरायगडSexual abuseलैंगिक शोषणCrime Newsगुन्हेगारी