Shocking! Sexual abuse of five girls by Bhondubaba at Pimpri | धक्कदायक ! गुप्तधन, पुत्रप्राप्तीच्या आमिषाने भोंदूबाबाकडून पाच तरुणींचे लैंगिक शोषण

धक्कदायक ! गुप्तधन, पुत्रप्राप्तीच्या आमिषाने भोंदूबाबाकडून पाच तरुणींचे लैंगिक शोषण

ठळक मुद्दे रायगडच्या भोंदुबाबाला अटक,  अंधश्रद्धा निर्मुलन समितीने आणला उघडकीसगुप्तधन, पुत्रप्राप्तीच्या आमिषाने भोंदूबाबाकडून पाच तरुणींचे लैंगिक शोषण

पुणे :पुत्राचा हव्यास आणि गुप्तधनाची आस यामुळे एक कुटुुंंब भोंदुबाबाच्या आमिषाला बळी पडले. त्यातून या भोंदुबाबाने भिती दाखवून कुटुंबातील ५ तरुणींचे लैंगिक शौषण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यावर कडी म्हणजे त्याने त्यांच्यातील एका तरुणीबरोबर स्वत:चे अगोदर लग्न झाले असतानाही दुसरे लग्न केले आहे. अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांमुळे हा प्रकार समोर आला आहे.

सोमनाथ कैलास चव्हाण (वय ३२, रा. खैरेवाडी, ता़ रोहा़ जि़. रायगड) असे या भोंदुबाबाचे नाव आहे. पिंपरी पोलिसांनी त्याच्याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मुलन व जादुदोणा प्रतिबंध कायदा तसेच पोक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल करुन त्याला अटक केली आहे.  हा प्रकार पिंपरीतील नेहरुनगरमध्ये २२ जानेवारीपासून २१ फेबु्रवारीपर्यंत सुरु होता. या कुटुंबातील एका २२ वर्षाच्या तरुणीने फिर्याद दिली आहे.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, सोमनाथ चव्हाण याने या कुटुंबास सांगितले की, तुमच्या घरामध्ये पुत्र प्राप्ती होऊ नये, म्हणून घरातील प्रत्येक सदस्यावर त्यांच्या नात्यातील बाईने करणी केली आहे. तुमच्या घरातील एका रुममध्ये गुप्त धन आहे. त्यामध्ये सात पेट्या धन, एक सोन्याची घागर, एक गणपतीची मुर्ती असा खजिना आहे. तुमच्या घरातील एका मुलीचा जीव धोक्यात आहे. तुम्हाला पुत्र प्राप्ती होण्यासाठी व गुप्तधन मिळविण्यासाठी आणि या मुलीचा जीव वाचविण्यासाठी त्याने तुमच्या घरात तीन उतारे व नग्न पुजा करावी लागेल, असे सांगितले. त्यासाठी ३ लाख रुपये खर्च येईल व मला ११ हजार रुपये दक्षिणा द्यावी लागेल़ तसे सांगितले. ते तीन उतारे तुम्ही १५ दिवसामध्ये सुरु केले नाही तर तुमच्या कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या जीवीतास खूप मोठा धोका आहे, अशी भीती या कुटुंबाला दाखविली. या सर्व प्रकाराने हे कुटुंब घाबरुन गेले. त्यांनी या पुजेला संमती दर्शविली. त्यानंतर त्याने एक दिवस रात्रीच्या वेळी या फिर्यादीच्या पाच बहिणींना उतारा करण्याच्या बहाण्याने रुममध्ये घेऊन दार बंद केले. त्यांना त्यांच्या अंगावरील सर्व कपडे काढून पांढऱ्या कपड्यावर झोपायला लावले. त्यानंतर त्याने लिंबु चिरुन त्याचा रस त्यांच्या अंगावर चोळला. अवघड जागी तो टाकला. त्यानंतर अश्लिल कृत्य केले. त्यांच्यातील एका बहिणीवर त्याने बलात्कार केला. त्यानंतर त्यांना बाहेर कोणाला काही सांगितले तर मी तुमच्या आई वडिलांना माझ्या दैवी शक्तीने व काळ्या जादूने मारुन टाकीन अशी भितीदायक धमकी दिली. त्यामुळे त्यांनी ही बाब तेव्हा कोणाला सांगितली नाही. २१ फेबु्रवारी रोजी त्याने तिसऱ्यावेळी उतारा काढतेवेळी त्यांच्यातील एका बहिणीवर तीनदा बलात्कार केला. तसेच त्याचे पूर्वी लग्न झाले असतानाही फिर्यादीच्या बहिणीबरोबर लग्न केले.या प्रकाराची माहिती अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या कार्यकर्त्यांना मिळाली. त्यांच्या मदतीने या तरुणीने पिंपरी पोलिसांकडे फिर्याद दिली आहे.

Web Title: Shocking! Sexual abuse of five girls by Bhondubaba at Pimpri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.