शहरं
Join us  
Trending Stories
1
नवी मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांसाठी दिवाळी बोनस जाहीर, कोणाला किती पैसे मिळणार?
2
'तिकीट वाटप'वरून काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये पाटणा एअरपोर्टवर तुफान हाणामारी, व्हिडीओ व्हायरल!
3
भीषण संघर्षानंतर पाकिस्तानची शस्रसंधीसाठी अफगाणिस्तानला विनवणी, दोन्ही देशांत ४८ तासांसाठी युद्धविराम
4
जैसलमेर दुर्घटनेनंतर आता जयपूरमध्ये धावत्या बसला आग, परिसरात खळबळ!
5
प्रसिद्ध लेखिका अर्चना शंभरकर यांचे निधन, वयाच्या ५२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास!
6
Bihar Elections: मैथिली ठाकूर यांचा मतदारसंघ ठरला, कुणाची तिकिटं कापली; भाजपची दुसरी यादी जाहीर
7
फूड डिलिव्हरी ॲपला २१ लाखांचा चुना, २ वर्षे फुकट जेवला; तरुणाचा झुगाड पाहून चक्रावून जाल!
8
सांगलीत 'भोसले टोळी'चा धुमाकूळ; भरदिवसा घरफोड्या करून ४७ तोळे सोने लंपास
9
Silver Supply Crunch: जास्त पैसे देऊन विकत घ्यायला तयार, पण लोकांना बाजारात चांदी मिळेना?
10
सासूसोबत अफेअर, अश्लील व्हिडीओ आणि..., जावयाच्या हत्येची धक्कादायक कहाणी समोर
11
रोहित शर्मा मोठ्या विक्रमाच्या उंबरठ्यावर; ५४ धावा करताच सौरव गांगुलीला टाकणार मागे!
12
डॉक्टर पतीने केली पत्नीची हत्या, भासवला नैसर्गिक मृत्यू , अखेर ६ महिन्यांनी असं फुटलं बिंग 
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

जिगरबाज पोलिसाची अकाली 'एक्झिट' ; कर्करोग, कोरोनाला हरवले, हृदयविकाराने गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 08:50 IST

इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही संकटावर व आजारावर तुम्ही मात करू शकता असे ते नेहमी सांगत असत..

ठळक मुद्देदुर्धर आजारांवर केली होती मात; शहर पोलीस दलावर शोककळा

पिंपरी : कर्करोग, कोरोनाला हरवून उच्चरक्तदाब, मधुमेह अशा दुर्धर आजारांचा यशस्वी सामना करणाऱ्या एका जिगरबाज पोलिसाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यामुळे शहर पोलीस दलावर शोककळा पसरली. सांगवी येथे शुक्रवारी (दि. ८) दुपारी अडीचच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली.

अविनाश विठ्ठल बोराटे (वय ४८), असे मृत्यू झालेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. बारोटे यांच्या मागे पत्नी रुपाली व मुलगा रसिक आहे. पदवीधर असलेल्या रुपाली या सांगवी येथील उरो रुग्णालयाच्या कर्मचारी आहेत. तर रसिक हा बारावी उत्तीर्ण झाला आहे.  हिंजवडी पोलीस ठाण्यात हवालदार म्हणून ते कार्यरत असताना त्यांची २१ डिसेंबर २०२० रोजी बदली होऊन ते २४ डिसेंबर रोजी हिंजवडी वाहतूक विभागात हजर झाले. त्यानंतर २ जानेवारी रोजी वैद्यकीय रजेवर गेले. घरीच उपचार घेत असताना शुक्रवारी त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे रुग्णालयात जाण्यासाठी त्यांनी स्वत: फोन करून रुग्णवाहिका बोलावून घेतली. ते रुग्णवाहिकेपर्यंत चालत गेले. त्यानंतर त्यांना मोठ्या प्रमाणात त्रास सुरू झाला. सांगवी येथील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारापूर्वीच डाॅक्टरांनी त्यांना मयत घोषित केले. 

बारामती तालुक्यातील शिर्सूफळ हे मूळगाव असलेले बोराटे यांना वयाच्या एकोणीसाव्या वर्षापासून मधूमेह तसेच च्चरक्तदाबाचाही त्रास होता. त्यावर नियंत्रण मिळवत ते १९९३ मध्ये पोलीस दलात भरती झाले. त्यानंतर त्यांच्या पोटात गाठ असल्याचे निदर्शनास आले. २०१३ मध्ये पोटाच्या कर्करोगाचे (स्टमक कॅन्सर) निदान झाले. कर्करोगाची दोनदा शस्त्रक्रिया झाली. गेल्या वर्षी जुलैच्या शेवटच्या आठवड्यात त्यांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला. त्यावर त्यांनी यशस्वीपणे मात केली.

शरद पवार ‘ग्रॅण्ड आयडॉल’दुर्धर आजारांवर मात करण्याची प्रेरणा अनेक प्रख्यात व्यक्तींकडून घेता येते. अविनाश बोराटे देखील क्रिकेटपटू युवराज सिंग व फ्रान्स येथील जगज्जेता सायकलपटू लान्स आर्मस्ट्राँग वार्ड यांच्यापासून प्रेरित झाले होते. तसेच ग्रॅण्ड आयडॉल शरद पवार यांच्याकडून त्यांनी प्रेरणा घेतली होती. या तिघांनी दुर्धर आजारांवर मात करून यश संपादन केले. इच्छाशक्ती असेल तर कोणत्याही संकटावर व आजारावर तुम्ही मात करू शकता, असे बोराटे सांगत असत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसDeathमृत्यूHeart Attackहृदयविकाराचा झटकाcorona virusकोरोना वायरस बातम्याcancerकर्करोग