शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

धक्कादायक ! अनधिकृत जमिनीचा ताबा हटविताना ज्येष्ठाने पोलिसाच्या पिस्तुलाला घातला हात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 6:08 PM

पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की करीत त्यांच्या कंबरेच्या डाव्या बाजुला लावलेल्या पिस्तुलाला आरोपीने हात घातला.

पिंपरी : अनधिकृत जमिनीचा ताबा काढण्यासाठी गेलेल्या पोलिसांना ज्येष्ठ नागरिकाने शिवीगाळ केली. पोलीस निरीक्षकांना धक्काबुक्की करीत त्यांच्या कंबरेला लावलेल्या पिस्तुलालाच हात लावल्याची घटना वाकड येथे घडली. त्यामुळे काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली. शिवीगाळ करुन दहशत पसरविणाऱ्या ज्येष्ठ नागरिकास पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी अटक केली.

विजय निवृत्ती वाघमारे (वय ६०, वाकड गावठाण) असे आरोपीचे नाव आहे. वाकड पोलीस ठाण्यातील हवालदार दीपक नामदेव गायकवाड (वय ४९) यांनी फिर्याद दिली आहे. थेरगाव येथील मंडल अधिकाऱ्यांनी वाकड मधे जागेचा अनधिकृत ताबा घेतल्याचा अर्ज वाकड पोलीस ठाण्यात आला होता. जमिनीची मोजणी करुन अनधिकृत ताबा काढण्यासाठी पोलीस बंदोबस्त देण्यात आला होता. त्यानुसार वाकड येथील वाघमारे भुयारी मार्गाजवळील जागेवर शासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि.१५) सकाळी पावणेबाराच्या सुमारास मोजणी सुरु होती. मोजणी करु नये आणि अनधिकृत ताबा काढू नये यासाठी मोजणी अधिकारी आणि पोलिसांना आरोपीने शिवीगाळ केली.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंदोबस्तावरील कर्मचाऱ्यांना सूचना देत असताना त्यांनाही आरोपीने शिवीगाळ केली. तसेच त्यांच्या अंगावर मारण्यासाठी धावून गेला. पोलीस निरीक्षकाला धक्काबुक्की करीत त्यांच्या कंबरेच्या डाव्या बाजुला लावलेल्या पिस्तुलाला आरोपीने हात घातला. पिस्तूल लावलेल्या अडकवणीचा पट्टा ओढण्याचा प्रयत्न केला. आरोपीने सरकारी कामात अडथळा आणून शिवीगाळ केली. तसेच दहशत निर्माण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस