शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

शिवसेना आमदार पुत्राचे प्रताप ; पोलीस अधिकाऱ्यांना त्रास 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2018 5:18 PM

शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचे चिरंजीव मित्र, मैत्रिणींना बरोबर घेऊन कासारवाडीतील पुलावर वाढदिवस साजरा करत होते.

ठळक मुद्देरस्त्यात वाढदिवसाची पार्टी, हटकणाऱ्याविरूद्ध तक्रार २१ आॅक्टोबर २०१७ ला घडलेल्या या घटनेसंबंधी आलेल्या तक्रारीची पोलीस आयुक्त शुक्ला यांच्याकडून गंभीर दखल नोटीसला स्पष्टपणे दिलेले उत्त्तर, मांडलेली वस्तुस्थिती यामुळे अखेर पोलीस महिलेवरील कारवाई मागे

पिंपरी : कासारवाडीतील उड्डाणपुलावर मित्र मैत्रिणींबरोबर रात्री एकच्या सुमारास वाढदिवस साजरा करणाऱ्या आमदार पुत्राला हटकणाऱ्या पोलीस अधिकारी महिलेला कारवाईस सामोरे जावे लागले. आमदारांच्या तक्रारीमुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी पोलीस उपनिरीक्षक महिलेला नोटीस बजावली. त्या नोटीसला स्पष्टपणे दिलेले उत्त्तर, मांडलेली वस्तुस्थिती यामुळे अखेर पोलीस महिलेवरील कारवाई मागे घेण्यात आली. तसेच नियमभंग करणारे आमदार पुत्र आणि त्याचे सहकारी यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी दिले असल्याने शहरात हा विषय चर्चेचा ठरला आहे. पिंपरी विधानसभा मतदार संघाचे शिवसेनेचे आमदार गौतम चाबुकस्वार यांचे चिरंजीव मित्र, मैत्रिणींना बरोबर घेऊन कासारवाडीतील उड्डाणपुलावर वाढदिवस साजरा करीत होते. काहीजण फटाके फोडण्याच्या तयारीत होते. रात्री एकच्या सुमारास भर रस्त्यात जल्लोषात वाढदिवस साजरा करण्याचा त्यांचा कार्यक्रम सुरू होता. पोलीस उपनिरीक्षक रूपाली पाटील यांच्या ही बाब निदर्शनास आली. त्यांनी ग्रुपला हटकले. रात्रीच्या वेळी सार्वजनिक शांततेचा भंग होईल, असे काही करू नका, असे समजून सांगण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यावेळी मी आमदारांचा मुलगा आहे. तुम्ही आम्हाला येथे वाढदिवस साजरा करण्यास मज्जाव करू शकत नाही असे आवाज चढवुन सांगितले.मात्र, पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी याठिकाणी वाढदिवसाचे सेलिब्रेशन करता येणार नाही,असे त्या मुलांना सांगितले. कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यांच्या पालकांशी संपर्क साधून दुसऱ्या दिवशी सकाळी पोलीस ठाण्यात भेटा असा निरोपही दिला. मात्र, या घटनेनंतर आमदार चाबुकस्वार यांनी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याकडे तक्रार केली. पोलीस अधिकारी महिलेने मुलाच्या कानफटात मारले असाही आरोप करण्यात आला. २१ आॅक्टोबर २०१७ ला घडलेल्या या घटनेसंबंधी आलेल्या तक्रारीची पोलीस आयुक्त शुक्ला यांनी गंभीर दखल घेतली. पोलीस उपनिरीक्षक पाटील यांना कारणे दाखवा नोटीस बजावुन आपली एक वेतनवाढ का रोखली जावू नये, अशी नोटीस पाटील यांना बजावली.  पोलीस आयुक्त शुक्ला यांनी दिलेल्या नोटीसचा पोलीस उपनिरीक्षक पाटील यांनी खुलासा केला. घडलेल्या घटनेबद्दलची वस्तुस्थिती त्यांनी विशद केली. योग्य प्रकारे स्पष्टीकरण दिले असल्याने त्यांच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली. एवढेच नव्हे तर पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितल्यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या त्या मुलांवर कारवाई करा. असे आदेश शुक्ला यांनी दिले आहेत. 

टॅग्स :kasarwadiकासारवाडीShiv SenaशिवसेनाMLAआमदारPoliceपोलिसRashmi Shuklaरश्मी शुक्ला