शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

दुर्देवी !! रेल्वेच्या धडकेत मेंढ्यांसह मेंढपाळाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 14:58 IST

नायगावच्या हद्दीतील मध्य रेल्वेच्या अप ट्रकवर शुक्रवार ( दि. ३० ) रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बंगळूरवरून मुंबईकडे दिशेने जाणाऱ्या उद्यान एक्सप्रेसची धडक बसून झालेल्या अपघातात एका मेंढपाळासह सुमारे १० ते १२ मेंढ्यांचा जागीच मृत्यु झाला.

कामशेत : शहराजवळील नायगावच्या हद्दीतील  मध्य रेल्वेच्या अप ट्रकवर शुक्रवार ( दि. ३० ) रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास बंगळूरवरून मुंबईकडे दिशेने जाणाऱ्या उद्यान एक्सप्रेसची धडक बसून झालेल्या अपघातात एका मेंढपाळासह सुमारे १० ते १२ मेंढ्यांचा जागीच मृत्यु झाला.            रेल्वे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार ( दि. ३० ) रोजी संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास नायगाव हद्दीत बाळू चिंधू चोपडे याच्या शेताच्या बाजूला माळरानात शेळ्या चरत असताना अचानक काही कुत्रे मेंढ्यांच्या कळपात शिरल्याने मेंढरे रेल्वे ट्रॅकवर ( रेल्वे किलोमीटर नंबर १४५/३१/३३ ) आल्या  त्यांना हुसकवण्याच्या प्रयत्न करीत असताना मागून आलेल्या एक्सप्रेसची धडक बसुन मेंढपाळ धूळा दामु कोकरे ( वय ४५, रा. खामकर झाप, पो, शिरापूर, ता. पारनेर जि.अहमदनगर ) ( सध्या रा. नायगाव, मावळ ) यांचा व त्यांच्या सुमारे १० ते १२ मेंढरांचा जागीच मृत्यु झाला.        नायगावच्या हद्दीत रेल्वेच्या ट्रॅक जवळ बाळू चिंधु चोपडे यांच्या शेताजवळ धुळा कोकरे यांच्या सह इतरांचा मेंढ्यांचा तांडा मुकामी आला होता. यावेळी तिथे असलेल्या स्थानिक कुत्र्यांनी जोरजोरात भुंकल्यामुळे व कळपात शिरल्याने घाबरलेल्या मेंढ्या रेल्वे ट्रॅकवर आल्या. यावेळी ट्रॅकवर आलेल्या मेंढ्या बाजुला काढत असताना मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या उद्यान एक्सप्रेसची ( गाडी न ११३०२ ) किलोमीटर न १४५/३२-३४ जवळ धडक बसून धूळा दामु कोकरे व १० - १२ मेंढ्यांचा मृत्यु झाला. याप्रकरणी तळेगाव स्टेशन लोहमार्ग पोलीस हवालदार संजय तोडमल, प्रियांका नाईक व आरपीआय चे सुर्वे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला तर तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. कानडे यांनी रात्री उशिरा शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

टॅग्स :Deathमृत्यूrailwayरेल्वेAccidentअपघातkamshetकामशेत