शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

शीतलबाग पुलाची चौकशी

By admin | Updated: September 13, 2016 00:55 IST

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांचा भाजपा प्रवेशाबाबतची रंगत असतानाच भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी शीतलबाग पादचारी

पिंपरी : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भोसरीचे अपक्ष आमदार महेश लांडगे यांचा भाजपा प्रवेशाबाबतची रंगत असतानाच भाजपाचे शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप यांनी शीतलबाग पादचारी पुलाच्या चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. शीतलबाग पुलाच्या वाढीव खर्चाच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. त्यामुळे दादांना शह देण्यासाठी भाऊंचा प्रयत्न तर नसेल ना, अशी चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे.महापालिका निवडणूक जवळ येऊ लागली आहे, तशा राजकीय घडामोडींना वेग येऊ लागला आहे. भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून लक्ष्मण जगताप यांनी सूत्रे स्वीकारल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी फोडण्यास सुरुवात झाली आहे. तसेच राष्ट्रवादीच्या गैरव्यवहाराची प्रकरणे उघडकीस आणली जात आहेत. विविध प्रकल्पांवर अनाठायी खर्च केला जात आहे, याबाबत भाजपाकडून आक्षेप नोंदविले जात आहेत. राष्ट्रवादी नगरसेवक आणि अपक्ष आमदार म्हणून लांडगे निवडून आले आहेत. लांडगे भाजपाच्या वाटेवर आहेत, अशी चर्चा वर्षभरापासू्न रंगली आहे. मात्र, याबाबत लांडगे यांनी अधिकृत घोषणा केलेली नाही. दरम्यान, त्यांच्या समर्थकांकडून दादा लवकरच भाजपात प्रवेश करणार आहेत, अशी आवई उठविली जात आहे. भोसरी विधानसभेतील उमेदवारीचे अधिकार लांडगे यांना दिले गेले आहेत, असा दावा समर्थकांनी केला आहे. अशी व्हॉट्स अ‍ॅप आणि सोशल मीडियावरील चर्चा रंगली आहे. दरम्यान, लांडगे आग्रही असणाऱ्या भोसरीतील शीतलबाग पुलाबाबत चिंचवडचे आमदार जगताप यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. ७१ लाख ५ हजार रुपये खर्च अपेक्षित असणाऱ्या पुलाचे बांधकाम साहित्यात वाढ झाल्याचे कारण पुढे करीत सुरुवातीला खर्च अडीच कोटींवर, त्यानंतर या पुलाच्या खर्चात वाढ तब्बल आठपट वाढ करून तो साडेपाच कोटींवर नेला आहे. या पादचारी पुलासाठी एका सपोर्ट कॉलमऐवजी दोन सपोर्ट कॉलम उभे करण्याच्या नावाखाली खर्चात आणखी दोन कोटी रुपयांची वाढ केली आहे. त्यामुळे या उड्डाणपुलाचा खर्च ७१ लाखांवरून थेट साडेसात कोटी रुपयांवर पोहोचल्याचे जगताप यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे चौकशीचे आदेश दिल्याने दादांना भाऊ शह तर देत नसतील ना, अशी चर्चा शहरात रंगली आहे. (प्रतिनिधी)