पिंपरी : पती-पत्नीने आपसात संगनमत करून एका तरुणीला इन्स्टाग्रामवरून अश्लील मॅसेज तसेच शिवीगाळ केली. हा प्रकार २९ ते ३१ जानेवारीला शितोळेनगर जुनी सांगवी येथे घडला. आरोपी पतीला अटक केली आहे.सांगवी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहित जोधपूरकर असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह पूजा मोहित जोधपूरकर हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. २४ वर्षीय तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी मोहित याने एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तरुणीला अश्लील मॅसेज केले. तसेच त्याची पत्नी पूजा हिने देखील एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तरुणीला अश्लील शिवीगाळ केली. याबाबत तरुणीने पोलिसात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी मोहितला गजाआड केले.
इन्स्टाग्राम वरून तरुणीला अश्लील मॅसेज, शिवीगाळ
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2020 13:04 IST