"माहेरून ५० हजार घेऊन ये", अशी मागणी करत विवाहितेवर लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 18:54 IST2021-06-23T18:54:35+5:302021-06-23T18:54:42+5:30
पिंपरी पोलिसांत पतीसहित नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल, तर एकाला अटक

"माहेरून ५० हजार घेऊन ये", अशी मागणी करत विवाहितेवर लैंगिक अत्याचार
पिंपरी: घर व व्यवसायासाठी माहेरून पैसे घेऊन ये, असे सांगून सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला. तसेच पतीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. याबाबत पतीसह नऊ जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून, पोलिसांनी एकाला अटक केली. विठ्ठलनगर, नेहरुनगर, पिंपरी येथे नऊ डिसेंबर २०२० पासून २२ जून २०२१ या कालावधीत ही घटना घडली. विवाहितेने याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात मंगळवारी फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पतीने विवाहितेकडे घर आणि व्यवसायासाठी माहेरून ५० हजार रुपये आणण्याची मागणी केली. पैसे न दिल्याने आरोपींनी विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केला. तिला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली. पतीने विवाहितेसोबत लैंगिक अत्याचार केला.