मेट्रीमनी वेबसाईटवरून ओळख करून तरुणीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2020 14:37 IST2020-03-02T14:27:38+5:302020-03-02T14:37:03+5:30

मेट्रीमनी वेबसाईटवरून ओळख झालेल्या तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून  तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तरुणाने लग्नास नकार दिला. पिंपरी व वाकड येथे २४ सप्टेंबर २०१९ रोजी हा प्रकार घडला. 

sexual harassment of girl by boy whom meet on Metriamy's website | मेट्रीमनी वेबसाईटवरून ओळख करून तरुणीवर अत्याचार

मेट्रीमनी वेबसाईटवरून ओळख करून तरुणीवर अत्याचार

पिंपरी : मेट्रीमनी वेबसाईटवरून ओळख झालेल्या तरुणाने तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून  तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तरुणाने लग्नास नकार दिला. पिंपरी व वाकड येथे २४ सप्टेंबर २०१९ रोजी हा प्रकार घडला. 

आदित्य विनोद चौबे (वय ३१, रा. रावेत, मूळगाव श्रीकृष्णनगर, वाठोडा ले आउट, नंदनवन, नागपूर) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी २७ वर्षीय महिलेने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आदित्य व फिर्यादी तरुणी यांची मेट्रीमोनी वेबसाईटवरून ओळख झाली. त्यानंतर आरोपी याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. २४ सप्टेंबर २०१९ रोजी पिंपरी येथे एका हॉटेलवर व २५ डिसेंबर २०१९ रोजी वाकड येथील भुमकर चौकातील एका हॉटेलवर तरुणीशी शरीर संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तरुणीने लग्नाचा तगादा लावला. त्यामुळे आरोपी व तरुणीच्या नातेवाईकांची नागपूर येथे बैठक केली. मात्र आरोपी व त्याच्या घरच्यांनी काहीएक कारण न देता लग्नास नकार दिला. तू माझ्याशी असे का केलेस, असे फिर्यादी तरुणीने आरोपी याला विचारले. मला तुझ्याशी लग्न करायचेच नव्हते, असे आरोपी म्हणाला. त्यामुळे फिर्यादी यांना धक्का बसला. तसेच तरुणी मानसिक तणावात होती. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Web Title: sexual harassment of girl by boy whom meet on Metriamy's website