अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2022 16:42 IST2022-06-11T16:35:26+5:302022-06-11T16:42:53+5:30
भोसरीमधील घटना....

अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन लैंगिक अत्याचार; गुन्हा दाखल
पिंपरी : पळवून नेऊन अल्पवयीन मुलीशी लग्न केले. त्यानंतर लैंगिक अत्याचाराने मुलीला आठ महिन्यांची गरोदर केले. भोसरी येथे ऑगस्ट २०२१ ते १० जून २०२२ या कालावधीत ही घटना घडली.
केदार राधेशाम प्रसाद (वय २०, रा. भोसरी, मुळ रा. भोपाल, मध्य प्रदेश) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी शुक्रवारी (दि. १०) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादीच्या १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला लग्न करण्यासाठी आरोपीने पळवून नेले. त्यानंतर तिच्याशी लग्न करून लैंगिक अत्याचार केले. यात अल्पवयीन मुलगी आठ महिन्यांची गरोदर राहिली, असे फिर्यादीत नमूद आहे. पोलीस उपनिरीक्षक संजय काळे तपास करीत आहेत.