अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; १९ वर्षीय तरुणाच्या विरोधात भोसरीत गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2021 17:23 IST2021-02-23T17:21:47+5:302021-02-23T17:23:38+5:30
तू मला आवडतेस, असे म्हणून तिला एका डोंगरावर आणि एका लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केले..

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; १९ वर्षीय तरुणाच्या विरोधात भोसरीत गुन्हा
पिंपरी : लैंगिक अत्याचार झाल्याने अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. जानेवारी २०२० पासून २३ फेब्रुवारी २०२१ रोजी या कालावधीत हा प्रकार घडला. याप्रकरणी १९ वर्षीय तरुणाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोनू शिवाजी साळुंके (वय १९, रा. भोसरी) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत ३५ वर्षीय महिलेने भोसरी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि. २३) फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादी यांच्या १५ वर्षीय मुलीशी लगट केली. तू मला आवडतेस, असे म्हणून तिला एका डोंगरावर आणि एका लॉजवर नेऊन लैंगिक अत्याचार केले. त्यातून अल्पवयीन मुलगी गरोदर राहिल्याने हा प्रकार उघडकीस आला.