लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 19:11 IST2021-05-27T18:56:16+5:302021-05-27T19:11:13+5:30
एका तरुणाला अटक

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार
ठळक मुद्देमुलगी पाच महिन्याची गरोदर
पिंपरी: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी तरुणाला अटक केली आहे. बावधन आणि पिंपळे निलख येथे फेब्रुवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत ही घटना घडली.
चेतन विवेक ओव्हाळ (वय २४, रा. पिंपळे निलख), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीने बुधवारी (दि. २६) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलगी ही अल्पवयीन असल्याचे माहिती असूनही त्यांना लग्नाचे आमिष दाखवून लैंगिक अत्याचार केले. मुलगी पाच महिन्याची गरोदर असल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.