भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत वाणी यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2020 11:49 IST2020-09-16T11:48:55+5:302020-09-16T11:49:16+5:30

पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे जेष्ठ नेते वसंत वाणी (वय ७६) यांचे मंगळवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

Senior BJP leader Vasant Vani passes away | भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत वाणी यांचे निधन

भाजपचे ज्येष्ठ नेते वसंत वाणी यांचे निधन

पिंपरी - पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे जेष्ठ नेते वसंत वाणी (वय ७६) यांचे मंगळवारी सायंकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

एक धडाडीचा संघटक पिंपरी चिंचवडला भाजपा उभारणीत मोलाची कामगिरी करणारा , राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा एक निस्सिम स्वंयसेवक असा त्यांचा परिचय आहे. आणीबाणीत १९ महिने नाशिक जेल मध्ये स्थानबद्ध राहिले होते. कै. प्रमोद महाजन , कै. गोपीनाथ मुंडे ,  केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अत्यंत विश्वासतील म्हणुन त्यांची गणना केली जाते. पिंपरी चिंचवड नवनगर पालिकेचे पहिले नगरसेवक (१९७८) म्हणुन निवडुन येऊन त्याची राजकीय कारकिर्द सुरु झाली. प्राधिकरण सदस्य म्हणुनही त्यांनी काम केले.

Web Title: Senior BJP leader Vasant Vani passes away