दारू पिण्यास मनाई केल्याने गुप्त अंगावर मारली लाथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 12:46 IST2021-05-26T12:46:34+5:302021-05-26T12:46:43+5:30

चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल

Secretly kicked for refusing to drink alcohol | दारू पिण्यास मनाई केल्याने गुप्त अंगावर मारली लाथ

दारू पिण्यास मनाई केल्याने गुप्त अंगावर मारली लाथ

ठळक मुद्देदमदाटी आणि शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी केली मारहाण

पिंपरी: गॅरेज समोर दारू पिण्यास मनाई करणाऱ्या गॅरेजवाल्याला शिवीगाळ करून गुप्त अंगावर लाथ मारल्याचा प्रकार पिंपरीत घडला आहे. याप्रकरणी चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. धिरज ट्रक बॉडी बिल्डर, रामनगर, चिंचवड येथे सोमवारी सायंकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

चुन्नुलाल सुखारी शर्मा (वय ५२, रा. चिंचवड) यांनी या प्रकरणी मंगळवारी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लाला अशोक शिंदे, बाळू अशोक शिंदे (दोघेही रा. रामनगर, चिंचवड) व त्यांचे दोन मित्र (नाव, पत्ता माहीत नाही), यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शर्मा स्वतःच्या गॅरेजसमोर उभे असताना आरोपी त्याठिकाणी दारू पिण्यासाठी आले. त्यांना आरोपी दारू प्यायला बसणार हे कळाले. म्हणून त्यांनी इथे दारू प्यायला बसू नका असे सांगितले. परंतु आरोपींनी मनमानी करत शर्मा यांना शिवीगाळ केली. त्यानंतर त्यांच्यातील एकाने गुप्त अंगावर लाथ मारली. तर तिघांनी मिळून हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पिंपरी पोलीस तपास पुढील करत आहेत.

Web Title: Secretly kicked for refusing to drink alcohol