शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
2
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
3
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
4
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
5
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
6
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
8
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
9
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
10
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
11
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
12
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
13
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
14
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
15
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
16
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
17
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
18
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
19
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
20
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!

Pimpri Chinchwad: शालेय शिक्षण मंत्री भुसेंची महापालिकेच्या शाळेला अचानक भेट; शिक्षकांसह अधिकाऱ्यांची उडाली धांदल

By प्रकाश गायकर | Updated: January 17, 2025 16:26 IST

मंत्र्यांच्या या भेटीमुळे तरी महापालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे

पिंपरी : शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपळे निलख शाळेला शुक्रवारी (दि. १७) अचानक भेट देत विद्यार्थ्यांना ‘सरप्राईज’ दिले. अचानक मंत्री शाळेत आल्याने शिक्षक आणि अधिकाऱ्यांची चांगलीच धांदल उडाली. दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. ते २० मिनिटांपेक्षा जास्त वेळ या शाळेत होते. 

 यावेळी जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, शिक्षण उपसंचालक हारुन आत्तार, माध्यमिकचे भाऊसाहेब कारेकर, पिंपरी चिंचवड महापालिका शिक्षणाधिकारी संगीता बांगर, शिक्षक संघाचे अध्यक्ष विलास पाटील आदी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी स्वागतगीत म्हणून आलेल्या सर्व पाहुण्यांचे स्वागत केले. यावेळी शिक्षकांनी शिकवण्याची पद्धत कशी आहे याचे प्रात्याक्षिक दाखवले. दादा भुसे यांनी  पाठ्यपुस्तकातील काही प्रश्न मुलांना विचारले. मुलांनी त्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.  

शालेय शिक्षण मंत्री शुक्रवारी पुणे दौऱ्यावर होते. सकाळी मुंबई-बेंगलोर रस्त्यावरून जात असताना त्यांनी पिंपरी- चिंचवड महापालिकेच्या पिंपळे निलख येथील शाळेला अचानक भेट दिली. या भेटीमुळे शाळेतील शिक्षकांचा चांगलाच गोंधळ उडाला. दादा भुसे यांनी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तकातील विविध प्रश्न विचारले, विद्यार्थ्यांनी देखील मंत्री भुसे यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. 

महापालिकेच्या शाळांकडे बघण्याचा पालकांचा दृष्टिकोन काही प्रमाणात बदलला आहे. तसेच अलीकडे पालक महापालिका शाळेमध्ये पाल्याला प्रवेश मिळावा यासाठी आग्रही असतात. महापालिकेच्या वतीने देखील शाळांमध्ये सोयी-सुविधा देण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. यामुळेच शालेय शिक्षण मंत्र्यांनी थेट महापालिकेच्या शाळेला भेट देऊन विद्यार्थ्यांची बौद्धिक तपासणी केली. मंत्र्यांच्या या भेटीमुळे तरी महापालिकेच्या शाळांचा दर्जा उंचावण्यास मदत होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मंत्र्यांनी अशाच पद्धतीने भेट दिल्यास शाळेची गुणवत्ता वाढेलच पण शिक्षकांवर काही प्रमाणात धाक राहणार असल्याची चर्चा या ‘सरप्राइज’ भेटीच्या निमित्ताने होत आहे. 

पवार गटाचे शहराध्यक्षही उपस्थित 

दरम्यान, पिंपळे निलख येथील शाळेत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे आल्याची माहिती मिळताच शरद पवार गटाचे शहराध्यक्ष तुषार कामठे देखील शाळेत पोहचले. त्यांनी ‘मी या भागातील नगरसेवक असून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचा शहराध्यक्ष असल्याची ओळख करून दिली.’

 

टॅग्स :PuneपुणेSchoolशाळाEducationशिक्षणStudentविद्यार्थीSocialसामाजिकministerमंत्रीNCPराष्ट्रवादी काँग्रेस