नवे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी स्वीकारला पदभार
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 15:36 IST2019-09-21T15:32:46+5:302019-09-21T15:36:27+5:30
पहिले पोलीस आयुक्त म्हणून पद्मनाभन यांची वर्णी लागली.

नवे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी स्वीकारला पदभार
पिंपरी : पिंपरी -चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आज (दि. २१) पदभार स्वीकारला. शहराचे पहिले पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन यांची शुक्रवारी (दि. २०) बदली. त्यानंतर आयुक्तपदी बिष्णोई यांची वर्णी लागली.
पिंपरी-चिंचवड शहरातील तसेच औद्योगिक पट्ट्यातील वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार गेल्या वर्षी शासनाकडून त्यास मंजुरी मिळून १५ आॅगस्ट २०१८ रोजी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय कार्यान्वित झाले. पहिले पोलीस आयुक्त म्हणून पद्मनाभन यांची वर्णी लागली.