फ्लॅट दाखवताना सहाव्या मजल्यावरून पडून सेल्स एक्झिक्युटिव्हचा मृत्यू; वाकडमधील घटना, ठेकेदारावर गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 11:09 AM2024-03-21T11:09:07+5:302024-03-21T11:09:24+5:30

बांधकामाचे ठेकेदार आणि सेल्स विभागाचे प्रमुख यांनी बांधकाम साइटवर कामगारांच्या सुरक्षेची काळजी न घेतल्याने हा प्रकार घडला

Sales executive dies after falling from sixth floor while showing flat Incident in Wakad crime against contractor | फ्लॅट दाखवताना सहाव्या मजल्यावरून पडून सेल्स एक्झिक्युटिव्हचा मृत्यू; वाकडमधील घटना, ठेकेदारावर गुन्हा

फ्लॅट दाखवताना सहाव्या मजल्यावरून पडून सेल्स एक्झिक्युटिव्हचा मृत्यू; वाकडमधील घटना, ठेकेदारावर गुन्हा

पिंपरी : ग्राहकांना सदनिका दाखवत असताना बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून पडून सेल्स एक्झिक्युटिव्हचा मृत्यू झाला. ही घटना २३ डिसेंबर २०२३ रोजी वाकडमधील निसर्ग बेलारोझ सोसायटी येथे घडली.

आशिष जव्हेरी (वय ४३) असे मृत्यू झालेल्या सेल्स एक्झिक्युटिव्हचे नाव आहे. याप्रकरणी आशिष यांच्या पत्नीने मंगळवारी (दि.१९) हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार ठेकेदार गुड्डू कसनू पवार (४०, रा. भूमकर वस्ती, हिंजवडी) आणि सेल्स विभागप्रमुख अभिषेक अभय देवने (२६, रा. वाकड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाकड येथे निसर्ग बेलारोझ सोसायटी या इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तिथे आशिष सेल्स एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करत होते. २३ डिसेंबर रोजी ते ग्राहकाला सदनिका दाखवण्यासाठी गेले. सहाव्या मजल्यावर सदनिका दाखवत असताना त्यांचा तोल जाऊन ते लिफ्टच्या डक्टमध्ये पडले. बांधकामाचे ठेकेदार आणि सेल्स विभागाचे प्रमुख यांनी बांधकाम साइटवर कामगारांच्या सुरक्षेची काळजी न घेतल्याने हा प्रकार घडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Web Title: Sales executive dies after falling from sixth floor while showing flat Incident in Wakad crime against contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.