शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

वाहतुकींचे नियम मोडून विरुद्ध दिशेने बुलेट चालवणे जीवावर बेतले; अपघातात सहप्रवाशाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2021 17:14 IST

(Accident) वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने थांबवलेल्या कारच्या दरवाजाला विरुद्ध दिशेने आलेल्या बुलेटची धडक बसली. बुलेटवरील सहप्रवासी खाली पडला आणि विरुद्ध दिशेने आलेल्या टेम्पोखाली आला. टेम्पोखाली चिरडून बुलेटवरील सहपप्रवाशाचा मृत्यू झाला.

पिंपरी : विरुद्ध दिशेने जाणाऱ्या तीन वाहनांचा अपघात झाला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. आळंदी रोड, दिघी येथे विठ्ठल मंदिराजवळ गुरूवार दुपारी हा अपघात झाला. वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने थांबवलेल्या कारच्या दरवाजाला विरुद्ध दिशेने आलेल्या बुलेटची धडक बसली. बुलेटवरील सहप्रवासी खाली पडला आणि विरुद्ध दिशेने आलेल्या टेम्पोखाली आला. टेम्पोखाली चिरडून बुलेटवरील सहपप्रवाशाचा मृत्यू झाला.

राम बाळासाहेब बागल (वय २४) असे मृत्यू झालेल्या नाव आहे. किशोर राजेंद्र बागल (रा. दिघी), सुरज जगन्नाथ घुले (वय २६, रा. बोपखेल), सुमित कालिदास परांडे (वय २८, रा. दिघी गावठाण), टेम्पो चालक यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिस शिपाई बाबाजी जाधव यांनी दिघी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राम आणि किशोर हे चुलत भाऊ आहेत. दोघेजण बुलेट दुचाकीवरून जात होते. किशोर बुलेट चालवत होता. त्यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून बुलेट विरुद्ध दिशेने नेली. रस्त्यात विरुद्ध दिशेला सुरज आणि सुमित यांनी त्यांची कार पार्क केली होती. त्यांनी कारचा डाव्या बाजूचा दरवाजा उघडला असता बुलेटची दरवाजाला धडक बसली. या धडकेत बुलेटवर मागच्या सीटवर बसलेला राम खाली पडला. त्यावेळी विरुद्ध दिशेने एक टेम्पो येत होता. त्या टेम्पोखाली आल्याने राम बागल याचा मृत्यू झाला.

टॅग्स :PuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिसArrestअटक