होर्डिंग काढण्यासाठी भाजपा सल्लागारांना तीन कोटींचा ठेका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2018 14:16 IST2018-11-28T14:06:53+5:302018-11-28T14:16:47+5:30

महापालिका हद्दीतील ३०० अनधिकृत फलक काढण्यासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये मंजूर केले आहेत.

Rs 3 crores contract to BJP advisers to remove hoarding | होर्डिंग काढण्यासाठी भाजपा सल्लागारांना तीन कोटींचा ठेका 

होर्डिंग काढण्यासाठी भाजपा सल्लागारांना तीन कोटींचा ठेका 

ठळक मुद्देएक अनधिकृत र्होडिंग काढण्यासाठी सुमारे सव्वा लाख रुपये खर्च येणार सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना सल्ला देणाऱ्या पक्षीय सल्लागारासाठीच ठेका देऊन पैशाची उधळपट्टी सुरू

पिंपरी : आकाशचिन्ह व परवाना विभागामार्फत सध्या जाहिरातफलक, र्होडिंग काढण्याची कारवाई मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. अनधिकृत र्होडिंग काढण्यासाठी स्थायी समितीने ३ कोटी ५० रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. मात्र हा खर्च संबंधित फ्लेक्स लावणाऱ्याकडून वसूल करण्याऐवजी महापालिका करत आहे. सत्ताधारी पदाधिकाऱ्यांना सल्ला देणाऱ्या पक्षीय सल्लागारासाठीच ठेका देऊन पैशाची उधळपट्टी सुरू आहे. ती रोखावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली आहे.  
साने यांनी आयुक्तांना पत्र दिले आहे.  ते म्हणाले,  नगररचना अधिनियम ५३, ५६ अन्वये महापालिका अनधिकृत बांधकामधारकांना संबंधित बांधकाम काढून घेण्याबाबत नोटीस देते किंवा अतिक्रमण कारवाई करून ते पाडून टाकते. त्या बदल्यात दंडात्मक वसुली करते. त्याच धर्तीवर अनधिकृत र्होडिंगवर कारवाई होणे गरजेचे आहे. महापालिका हद्दीतील ३०० अनधिकृत फलक काढण्यासाठी तब्बल साडेतीन कोटी रुपये मंजूर केले आहेत. म्हणजे एक अनधिकृत र्होडिंग काढण्यासाठी सुमारे सव्वा लाख रुपये खर्च येणार आहे. हा खर्च त्यांच्याकडूनच वसूल करायला हवा. त्यावर करदात्यांचा पैसा उधळण्याची आवश्यकता नाही, असे साने यांनी म्हटले आहे. 

Web Title: Rs 3 crores contract to BJP advisers to remove hoarding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.