शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
2
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
3
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
4
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
5
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
6
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
8
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
9
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
10
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
11
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
12
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
13
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
14
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
15
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
16
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
17
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
19
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
20
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला

मुस्लिम समाजाचा ओबीसी दाखला परत करत ‘त्यांनी’उभारला नवा आदर्श 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 4:17 PM

मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शासनाला ओबीसी म्हणून दिलेल्या सर्व सवलती, योजना, आर्थिक सहाय्य व अनुदानासहित प्राप्त असलेले सर्व प्रकारचे आरक्षण हक्क स्वेच्छेने सोडून देत असल्याचे खान यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

ठळक मुद्देमराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी घेतला निर्णय  मराठा आणि इतर समाजातील गरीब असलेल्यांना आरक्षण टक्केवारीतून दिलासा देण्यासाठी असा प्रयत्न करावा असे आवाहन दोन मुलांचीही ओबीसी प्रमाणपत्रे ते दोघे शासनास लवकरच परत करणार

तळेगांव स्टेशन : मराठा समाजाला पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम बांधवांनी आपला ओबीसी दाखल शासनाला दिला परत सवलती घेणार नसल्याचे जाहीर केले आहे. सकल मराठा समाजाला कृतिशील समर्थनार्थ तळेगाव दाभाडे येथील सरसेनापती उमाबाई दाभाडे ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अमीन खान यांनी त्यांचा ओबीसी मूळ दाखला व समाज कल्याण खात्याचे रोजगार हमी कार्ड महाराष्ट्र शासनास आज साभार परत केले. मावळ तहसीलदारामार्फत सदर दाखला उपविभागीय दंडाधिकारी यांना गुरुवारी सुपूर्द केला.राज्यातील विविध भागातील शेतकरी आणि सकल मराठा समाज ज्या तऱ्हेने उपेक्षित, दुर्लक्षित, पीडित आणि आर्थिक दृष्ट्या रसातळाला जात आहे व न्यायासाठी आक्रोश करत आहे त्या मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शासनाला ओबीसी म्हणून दिलेल्या सर्व सवलती, योजना, आर्थिक सहाय्य व अनुदानासहित प्राप्त असलेले सर्व प्रकारचे आरक्षण हक्क स्वेच्छेने सोडून देत असल्याचे खान यांनी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. याबाबत ते म्हणाले की, मला प्राप्त ओबीसीचा लाभ माझ्या मराठा समाजातील गरजु कोणा एका बहिणीसाठी राखी पौर्णिमेची भेट म्हणून देण्यास शासनाने मंजुरी दयावी अशी शासनाला विनंती केली आहे.मुस्लिम ओबीसी समाजातील आर्थिकदृष्ट्या सक्षम असणाऱ्यांनी देखील ओबीसीचे हक्कसोड पत्र शासनास परत करून मराठा आणि इतर समाजातील गरीब असलेल्यांना आरक्षण टक्केवारीतून दिलासा देण्यासाठी असा प्रयत्न करावा असे आवाहन त्यांनी केले. विशेष म्हणजे त्यांच्या दोन्ही मुलांना शिक्षण आणि नोकरीसाठी ओबीसीच्या कोणत्याही सवलती न घेण्याबाबत त्यांनी सांगितले असून त्यास त्यांच्या सिकंदर व सैफ या दोन्ही मुलांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. या दोघांचीही ओबीसी प्रमाणपत्रे ते दोघे शासनास लवकरच परत करणार असल्याचे खान यांनी सागितले.

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसPuneपुणेMuslimमुस्लीमOBCअन्य मागासवर्गीय जातीmarathaमराठा