शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वीकृत’पासून खरे दावेदार दूरच

By admin | Updated: August 23, 2015 04:36 IST

प्रभाग समित्यांवर स्वीकृत सदस्यपदी निवड करताना सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनाच संधी दिली जावी, असा नियम असताना

पिंपरी : प्रभाग समित्यांवर स्वीकृत सदस्यपदी निवड करताना सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या कार्यकर्त्यांनाच संधी दिली जावी, असा नियम असताना, त्या नियमाला बगल देऊन राजकीय पक्षांशी संबंधित असलेल्या कार्यकर्त्यांनाच संधी दिली गेली आहे. एवढेच नव्हे, तर एका विशिष्ट राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच संधी दिली गेली आहे. या पदासाठी सामाजिक संघटनांच्या माध्यमातून काम करणारे कार्यकर्तेच या पदाचे खरे दावेदार आहेत. राजकारण्यांच्या मनमानी कारभारामुळे त्यांना या संधीपासून वंचित राहावे लागते आहे. महापालिकेच्या ‘अ’ ‘ब’ ‘क’ ‘ड’ ‘ई’ आणि ‘फ’ या सहा प्रभागांमध्ये शुक्रवारी स्वीकृत सदस्यांची निवड करण्यात आली. प्रभाग समिती स्वीकृत सदस्यपदासाठी ११३ जण इच्छुक होते. प्रत्येक प्रभागात ३ या प्रमाणे सहा प्रभागांत एकूण १८ सदस्य निवडले गेले. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुमत आहे. साहजिकच प्रभाग समिती सदस्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांची संख्या अधिक आहे. प्रभाग अध्यक्षसुद्धा त्यांच्याच पक्षाचे आहेत. त्यामुळे स्वीकृत सदस्य निवडताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनाच संधी दिली गेली आहे. अन्य पक्षांचे कार्यकर्तेही या पदासाठी इच्छुकहोते. परंतु बहुमत राष्ट्रवादीचे असताना, दुसऱ्या पक्षांच्या कार्यकर्त्यांची डाळ शिजणार नाही, हे ओळखून इच्छा असूनही अनेकांनी स्वीकृत सदस्यपदासाठी हालचाल करणे टाळले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी स्वीकृत सदस्य पदावर संधी देताना, गटातटाचे राजकारण केले आहे.