पैसे देण्यास नकार दिल्याने चाकूने वार करून लुटले; एकाला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 21:41 IST2021-09-08T21:41:15+5:302021-09-08T21:41:36+5:30

पैसे देण्यास नकार दिल्यामुळे चिडलेल्या आरोपीने अंडाभूर्जीच्या गाडीवरील मिरची पूड फिर्यादीच्या तोंडावर टाकली.

Refusing to pay, he was stabbed and robbed to person in pimpri | पैसे देण्यास नकार दिल्याने चाकूने वार करून लुटले; एकाला अटक

पैसे देण्यास नकार दिल्याने चाकूने वार करून लुटले; एकाला अटक

पिंपरी : पैशांची मागणी केली असता ते देण्यास नकार दिल्याने सिमेंटच्या गट्टुने मारहाण केली. तसेच मिरचीपूड चेहऱ्यावर फेकून अंडाभूर्जीच्या गाडीवरील गल्ल्यातून दोन ते तीन हजार काढून घेतले. याप्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली. थेरगाव येथे रविवारी (दि. ५) रात्री पावणे अकराच्या सुमारास ही घटना घडली.

नीलेश पोपट राजिवडे (वय ३२, रा. दिवड राजेवाडी, ता. मावळ), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. संजय नारायण जाधव (वय ४३, रा. वाल्हेकवाडी, चिंचवड), असे जखमी झालेल्याचे नाव असून त्यांनी मंगळवारी (दि. ७) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने फिर्यादीकडे पैसे मागितले. मात्र त्यांनी पैसे देण्यास नकार दिला. या कारणावरून चिडलेल्या आरोपीने अंडाभूर्जीच्या गाडीवरील मिरची पूड फिर्यादीच्या तोंडावर टाकली. त्यानंतर गल्ल्यात हात घालून दिवसभर केलेल्या धंद्याचे दोन ते तीन हजार रुपये जबरदस्तीने काढून घेतले. फिर्यादीेन विरोध केला असता आरोपीने खिशातील चाकू बाहेर काढून फिर्यादीवर चाकूने वार केले. तसेच सिमेंटचा गट्टू पायावर मारून गंभीर जखमी केले. सहायक पोलीस निरीक्षक अभिजित जाधव तपास करीत आहेत.

Web Title: Refusing to pay, he was stabbed and robbed to person in pimpri