मूल होण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्यांच्या नावाखाली गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार  

By नारायण बडगुजर | Updated: July 19, 2022 18:42 IST2022-07-19T18:38:39+5:302022-07-19T18:42:52+5:30

फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक अत्याचार

Raped a woman by giving gungi medicine in the name of Ayurvedic pills to get a child | मूल होण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्यांच्या नावाखाली गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार  

मूल होण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्यांच्या नावाखाली गुंगीचे औषध देऊन महिलेवर बलात्कार  

पिंपरी : मूल होण्यासाठी महिलेला आयुर्वेदिक गोळ्या देण्याच्या नावाखाली गुंगीच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे महिलेला गुंगी आल्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. त्याचे फोटो काढून ते व्हायरल करण्याची धमकी देऊन पुन्हा लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार १० फेब्रुवारी २०२१ ते २१ एप्रिल २०२२ या कालावधीत भोसरी, शिरूर येथे घडला.

पिडीत २५ वर्षीय महिलेने सोमवारी (दि. १८) भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. राजू नानाभाऊ गुलदगड (वय ५०, रा. चाकण) याच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला चाकण येथे कपडे खरेदी करण्यासाठी गेल्या असताना त्यांची आरोपीशी ओळख झाली.

आरोपीने फिर्यादीला मूल होण्यासाठी आयुर्वेदिक गोळ्या देऊन त्यांच्याकडून ९० हजार रुपये घेतले. फेब्रुवारी २०२२ मध्ये आरोपी फिर्यादीच्या घरी आला. मूल होण्यासाठी त्याने गोळ्या आणल्या असल्याचे महिलेला सांगितले. त्याच्याकडील गुंगी येण्याची गोळी फिर्यादी यांना खायला दिली. फिर्यादी महिलेला गुंगी आली असता आरोपीने त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला.

फिर्यादीचे नग्नावस्थेत फोटो काढले. फिर्यादी यांना जाग आल्यानंतर आरोपीने त्यांना ते फोटो दाखवले. घडलेल्या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर ते फोटो व्हाट्सअप, फेसबुकवर व्हायरल करण्याची आरोपीने धमकी दिली. त्यानंतर फिर्यादीला वेळोवेळी त्यांच्या घरी आणि शिरूर येथील एका लॉजवर नेऊन अत्याचार केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

Web Title: Raped a woman by giving gungi medicine in the name of Ayurvedic pills to get a child