पिंपरी-चिंचवडमध्ये भरचौकात अल्पवयीन मुलांचा राडा; कोयत्याने वार करीत लुटमार

By रोशन मोरे | Updated: August 9, 2023 15:58 IST2023-08-09T15:57:23+5:302023-08-09T15:58:53+5:30

या प्रकरणी पोलिस निरिक्षक विवेक विनायक कुमटकर यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे....

Rampage of minors in Bharchowka in Pimpri-Chinchwad; Robbery by stabbing | पिंपरी-चिंचवडमध्ये भरचौकात अल्पवयीन मुलांचा राडा; कोयत्याने वार करीत लुटमार

पिंपरी-चिंचवडमध्ये भरचौकात अल्पवयीन मुलांचा राडा; कोयत्याने वार करीत लुटमार

पिंपरी : चौकात रस्ताने येणाऱ्या जाणाऱ्यांना चार अल्पवयीन मुलांनी कोयत्याचा धाक दाखवून दहशत निर्माण केली. तसेच कोयत्याने हल्ला करून लोकांना जखमी करत त्यांच्या खिशातील २८ हजार रुपये किंमतीचे सात मोबाईल तसेच एक दुचाकी हिसकावून नेली. ही घटना सोमवारी (दि.७) रात्री बाराच्या सुमारास चिखलीतील साने चौकात घडली. या प्रकरणी पोलिस निरिक्षक विवेक विनायक कुमटकर यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीच्या उद्देशाने आरोपींनी दोघांवर कोयत्याने वार केले. एकाची दुचाकी हिसकावून घेतली. तसेच वाहनांची तोडफोड केली. आरोपींनी सात नागरिकांचे २८ हजार रुपये किंमतीचे सात मोबाइल कोयत्याचा धाकाने हिसकावले. आरोपींनी जे विरोध करत होते त्यांच्यावर आरोपींनी कोयत्याने हल्ला केला. दोघे जण या हल्ल्यात जखमी झाले.

Web Title: Rampage of minors in Bharchowka in Pimpri-Chinchwad; Robbery by stabbing