शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
4
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
5
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
6
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
7
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
8
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
9
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
10
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
11
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
12
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
13
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
14
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
15
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
16
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
17
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
18
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
19
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
20
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त

पावसाची संततधार; पर्यटकांचा हिरमोड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 02:02 IST

पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ, मुळशी तालुक्यात पावसाचा जोर सुरू आहे. जोरदार पावसामुळे पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांची पाणीपातळी वाढली आहेत.

पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरासह मावळ, मुळशी तालुक्यात पावसाचा जोर सुरू आहे. जोरदार पावसामुळे पवना, मुळा आणि इंद्रायणी नद्यांची पाणीपातळी वाढली आहेत. तसेच उद्योगनगरीच्या पिण्याच्या पाण्याचाही प्रश्नही सुटला आहे. लोणवळ्यात पावसाची नोंद झाली आहे, तर पवना धरण परिसरात सायंकाळी पाचपर्यंत साठ मिमी पावसाची नोंद झाली आहे. भुशी धरणाच्या सांडव्यातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत असल्याने पर्यटकांना पायऱ्यांवर बसण्यास मज्जाव करण्यात आला होता. त्यामुळे पर्यटकांचा हिरमोड झाला.पावसाची संततधार सुरूच आहे. सुटीचा दिवस असतानाही नागरिकांना पावसामुळे खरेदीसाठी बाजारपेठेत पडणे अशक्य झाले होते. सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. अधून मधून जोरही वाढत आहे. पाऊस सुरू असल्याने एरवी शनिवार-रविवारी गर्दी असणाºया पिंपरी कॅम्प बाजारपेठेत गर्दी नसल्याचे दिसून आले. शुकशुकाट जाणवत होता. तसेच पावसामुळे शहर परिसरातील बहुतेक प्रमुख रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना वाहन चालविणे अवघड झाले आहे. ग्रामीण भागातील लायन्स पॉइंट, कार्ला व भाजे धबधबा, लोहगड, विसापूर या ठिकाणीदेखील गर्दी केल्याने वाहतूककोंडी निर्माण झाली होती.>लोणावळा : लोणावळा परिसरात मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने डोंगरभागातून वेगाने धबधबे वाहू लागले आहेत. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भुशी धरणाच्या सांडव्यावरून वेगाने पाणी वाहू लागल्याने पर्यटकांना धरणाच्या पायºयावर जाणे व बसणे मुश्कील झाल्याने पर्यटकांची घोर निराशा झाली. पर्यटकांच्या सुरक्षेकरिता या ठिकाणी शहर पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात ठेवला आहे. शनिवार, रविवार तसेच सुटीच्या दिवसांत सायंकाळी पाचनंतर भुशी धरणाकडे जाणारा मार्ग पर्यटकांकरिता बंद करण्याचा निर्णय पोलीस प्रशासनाने जाहीर केल्यानंतर या धरणावर वर्षाविहाराचा आनंद घेण्याकरिता आज सकाळपासूनच धरणावर पर्यटकांनी गर्दी केली होती. मात्र, मध्यरात्रीपासून पावसाचा जोर वाढल्याने धरणाच्या सांडव्यावरून वेगाने पाणी पायºयांवर येऊ लागल्याने या पायºयापर्यंत जाणे व त्यावर बसणे मुश्कील झाल्याने या ठिकाणी आलेल्या पर्यटकांची निराशा झाली.>कोंडीलायन्स पॉइंट परिसरात पाऊस व धुके असल्याने पर्यटकांना काहीसा थ्रिल अनुभवता आला असला, तरी लायन्स पॉइंटचे सौंदर्य व गिधाड तलावाच्या धबधब्यात भिजण्याच्या आनंदाला मुकावे लागले. वाहतूककोंडी झाली होती.बारा दिवसांत १२४६ मिमी पाऊसलोणावळा परिसरात १२ दिवसांत १२४६ मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर आजही कायम असल्याने परिसरातील ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. लोणावळ्यात डोंगरभागातून वेगाने धबधबे वाहू लागले आहेत. पर्यटकांचे आकर्षण असलेल्या भुशी धरणाच्या सांडव्यावरून वेगाने पाणी वाहू लागल्याने पर्यटकांना धरणाच्या पायºयावर जाणे व बसणे मुश्कील झाल्याने पर्यटकांची घोर निराशा झाली. शनिवार, रविवार, तसेच सुटीच्या दिवसांत सायंकाळी पाचनंतर भुशी धरणाकडे जाणारा मार्ग पर्यटकांकरिता बंद केला. पाणी वाढल्याने अनेक ठिकाणी धबधब्याची पाणी पातळी वाढल्याचे दिसून आले. पवना धरण परिसरात सायंकाळी पाचपर्यंत ६५ टक्के पावसाची नोंद झाली आहे, तर पवना धरण ६० टक्के भरले आहे. भराव यामुळे पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद झाल्याने भातशेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.पावसाने सरासरी ओलांडलीपावसाचे माहेरघर अशी ओळख असलेल्या लोणावळा शहरात ४९.६ इंच एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा जोर आजही कायम असल्याने परिसरातील ओढे-नाले नदीपात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. मागील दीड आठवड्यापासून परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने वलवण, शिरोता, पवना, आंद्रा, वाडिवळे ही मावळ तालुक्यासह पिंपरी-चिंचवड परिसराला पाणीपुरवठा करणारी धरणे पन्नास टक्क्यांच्या पुढे गेली आहे. लोणावळा धरणातूनदेखील खोपोली वीजनिर्मिती केंद्राला मोठ्या प्रमाणात पाणी सोडले जात आहे. जूनच्या संपूर्ण महिन्यात केवळ २९ इंच असलेला पाऊस पंधरा दिवसांत ८३ इंचांवर गेला आहे. गवळीवाडा नाका परिसरात चालणेदेखील मुश्किल होत आहे. हीच परिस्थिती भुशीगाव ते भुशी धरण परिसरात आहे.