स्पा मसाज पार्लरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा; दोन महिलांची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 14:43 IST2021-01-20T14:43:10+5:302021-01-20T14:43:39+5:30
पुणे - मुंबई महामार्गावर नाशिक फाट्याजवळ असलेल्या 'व्हीआयपी स्पा अँड ब्युटी' येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

स्पा मसाज पार्लरमध्ये सुरु असलेल्या वेश्या व्यवसायावर छापा; दोन महिलांची सुटका
पिंपरी : स्पा मसाज पार्लरमध्ये महिलांकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याचे समोर आले आहे. पिंपरी-चिंचवडपोलिसांच्या सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून या स्पावर कारवाई करून दोन महिलांची सुटका केली. याप्रकरणी एका महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सीमा चरणदास शिंदे (वय ३५, रा. बिबवेवाडी, मार्केटयार्ड, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे. पुणे - मुंबई महामार्गावर नाशिक फाट्याजवळ असलेल्या व्हीआयपी स्पा अँड ब्युटी येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी स्पा सेंटरवर छापा मारला. त्यात दोन महिलांची सुटका केली. तसेच १२ हजार ७२० रुपयांची रोकड, १९ हजारांचे तीन मोबाईल फोन आणि ३५ रुपयांचे इतर साहित्य असा एकूण ३१ हजार ७५५ रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे.