पिंपरी भाजी मंडई जवळ असणाऱ्या 'स्पा' सेंटरवर छापा, एका महिलेची सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2021 14:24 IST2021-06-15T14:23:55+5:302021-06-15T14:24:01+5:30
एकाला अटक करण्यात आली असून चार जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी भाजी मंडई जवळ असणाऱ्या 'स्पा' सेंटरवर छापा, एका महिलेची सुटका
पिंपरी : पिंपरी भाजी मंडई येथे सृष्टी स्पा सेंटर मध्ये स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी स्पा सेंटरवर छापा मारून कारवाई केली. यामध्ये एका महिलेची सुटका करण्यात आली आहे. यामध्ये एका महिलेची सुटका करण्यात आली असून, चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील एकाला पोलिसांनी अटक केली आहे. सोमवारी दुपारी पिंपरी मंडई येथे ही कारवाई करण्यात आली.
अक्षय शरद भालेराव (वय २३, रा. निगडी गावठाण) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यासह राहुल जाधव, वैशाली मॅडल, वैभव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलीस नाईक जमीद तांबोळी यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.