दापोडीत टोळक्याचा राडा ; दहशतीसठी कोयत्याने तोडफोड

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2021 10:40 IST2021-06-01T10:39:15+5:302021-06-01T10:40:50+5:30

रिव्हॉल्वर ने मारून टाकण्याची धमकिब

Radha of the gang in Dapodi; Scavenging for terror | दापोडीत टोळक्याचा राडा ; दहशतीसठी कोयत्याने तोडफोड

दापोडीत टोळक्याचा राडा ; दहशतीसठी कोयत्याने तोडफोड

रिक्षा न विचारता नेल्याने त्याचा जाब विचारला. त्याचा राग येऊन घरात घुसून शिवीगाळ व मारहाण केली. कोयत्याने काचेच्या दोन खिडक्या, सायकल व मेनगेटचीही तोडफोड केली. रिव्हॉल्वरने मारून टाकण्याची धमकी देऊन दहशत माजवली. जयभीम नगर, दापोडी येथे सोमवारी (दि. ३१) ही घटना घडली. 

फरिदा अख्तर शेख (वय ४०, रा. जयभीम नगर, दापोडी) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. साहील वाल्मीकी, नरेश वाल्मीकी, बॉबी पिल्ले, जंगल्या उर्फ अक्षय भालेराव, कानसो (पूर्ण नाव व पत्ता माहीत नाही), अशी आरोपींची नावे आहेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादीची रिक्षा न विचारता नेली होती. त्याचा फिर्यादीने आरोपींना जाब विचारला. त्यावरून आरोपींनी फिर्यादीशी भांडण करून शिवीगाळ केली. त्यानंतर आरोपी कानसो याने कोयता घेऊन इतर आरोपींना सोबत आणून फिर्यादीच्या लहान दिराच्या घरात घुसून त्यांना शिवीगाळ केली. त्यांच्या घराच्या दरवाजावर कोयत्याने मारले. काचेच्या दोन खिडक्या फोडल्या. पार्किंगमधील सायकरलचे तोडून नुकसान केले. बाहेरील मेनगेट फोडले. फिर्यादीच्या जाऊला धक्काबुक्की करून तिच्या मुलाला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून त्याचे कपडे फाडले. 

बाची व बाच्या पोराची विकेट घेतल्याशिवाय आम्ही हजर होणार नाही, अशी मारण्याची धमकी आराेपी साहील याने दिली. तसेच फिर्यादी तक्रार देण्यासाठी भोसरी पोलीस ठाण्यात आल्या होत्या. आराेपी साहील हा प्रितम यादव याच्यासोबत रिव्हॉल्वर घेऊन फिर्यादीच्या दिराच्या घरी आला. फिर्यादीचे दिर बा यांना रिव्हॉल्वरने मारून टाकण्याची धमकी दिली, असे फिर्यादीच्या दिराने त्यांना फोन करून सांगितले. आरोपींनी परिसरामध्ये दहशत माजवली व लोकांनी भीतीने तेथून पळून जात घरात जाऊन घरे बंद करून घेतली, असे फिर्यादीत नमूद केले आहे. सहायक पोलीस निरीक्षक आनंद अनगळ तपास करीत आहेत.

Web Title: Radha of the gang in Dapodi; Scavenging for terror