लस्सी व आईस्क्रीम घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी पळविली पर्स, मोबाईल आणि रोकड 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 14:06 IST2021-03-10T14:04:23+5:302021-03-10T14:06:38+5:30

एकूण सात हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल नेला चोरून...

Purse, mobile and cash were theft by customers who came to buy lassi and ice cream | लस्सी व आईस्क्रीम घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी पळविली पर्स, मोबाईल आणि रोकड 

लस्सी व आईस्क्रीम घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी पळविली पर्स, मोबाईल आणि रोकड 

पिंपरी : लस्सी पिण्यासाठी व आईस्क्रीम घेण्यासाठी आलेल्या ग्राहकांनी लेडीज पर्स, मोबाईल व रोख रक्कम चोरून नेली. चोरट्यांनी एकूण सात हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चिखली येथील नेवाळे वस्ती येथे आर. एस. डेअरी या आइस्क्रीम पार्लर येथे मंगळवारी (दि. ९) दुपारी पावणेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. 

स्नेहा दुर्गेश बैस (वय ३२, चिखली) यांनी या प्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या आर. एस. डेअरी या आइस्क्रीम पार्लरमध्ये ग्राहकांना लस्सी देऊन आईस्क्रीम मोजून देत होत्या. त्यावेळी तेथे लस्सी पीत असलेल्या व आईस्क्रीम घेण्यासाठी आलेल्या दोन अनोळखी ग्राहकांपैकी कोणीतरी फिर्यादी यांची लेडीज पर्स, मोबाईल व रोख रक्कम, असा एकूण सात हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

Web Title: Purse, mobile and cash were theft by customers who came to buy lassi and ice cream