पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडचीही कायदा सुव्यवस्था धोक्यात ?; अज्ञातांकडून १३ वाहनांची तोडफोड
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2020 16:38 IST2020-02-02T16:32:59+5:302020-02-02T16:38:39+5:30
उद्योगनगरीत वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहेत. गेल्याच महिन्यात पिंपरी व काळेवाडीत अशा घटना घडल्या होत्या.

पुण्याप्रमाणे पिंपरी-चिंचवडचीही कायदा सुव्यवस्था धोक्यात ?; अज्ञातांकडून १३ वाहनांची तोडफोड
पिंपरी : उद्योगनगरीत वाहन तोडफोडीचे सत्र सुरूच आहेत. गेल्याच महिन्यात पिंपरी व काळेवाडीत अशा घटना घडल्या होत्या. तसाच प्रकार अजंठानगर, चिंचवड येथे रविवारी (दि. २) पहाटे घडला. यात पूर्ववैमनस्यातून एका टोळक्याने १३ वाहनांची तोडफोड करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे चारच्या सुमारास सात ते आठ जणांच्या टोळक्याने लाकडी दांडके, दगड तसेच इतर हत्यारांनी १३ वाहनांची तोडफोड केली. यातील एका आरोपीची ओळख पटलेली आहे. तो २०१७ मध्ये अजंठानगर परिसरातून इतर ठिकाणी राहण्यास गेला. पूर्ववैमनस्यातून त्याने हे कृत्य केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.
दरम्यान वाहनतोडीच्या या घटनांमुळे सर्वसामान्यांमध्ये दहशत आहे. त्यांच्या वाहनांचे नाहक नुकसान होत आहे. त्यामुळे शहरवासीयांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे.