शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

पुणे - मुंबई महामार्गावर रस्ता ओलांडताना डंपरखाली सापडून एकाचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 17:31 IST

महामार्गावर तळेगाव खिंडीतील विजय मारुती मंदिराजवळ मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.

ठळक मुद्देअपघातात मृत्युमुखी पडलेला रंगकाम करणारा कुशल कारागीर

तळेगाव दाभाडे : पुणे - मुंबई महामार्गावर रस्ता ओलांडताना डंपरखाली सापडून एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. हा अपघात जुन्या महामार्गावर तळेगाव खिंडीतील विजय मारुती मंदिराजवळ मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास झाला. सिद्धार्थ इरन्ना मुच्छंडी (वय ४५, रा. नीळकंठनगर, तळेगाव दाभाडे) असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव आहे. तो रंगकाम करणारा कुशल कारागीर होता.

या अपघातात डंपरचालक किरकोळ जखमी झाला असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे. या विचित्र झालेल्या अपघातामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.

पोलीस उपनिरीक्षक अनिकेत हिवरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, वडगाव बाजूकडून पुण्याच्या दिशेने जाणारा डंपर नॅशनल हेवी कंपनीसमोरील छेद रस्त्याजवळ आला असता पादचाऱ्यास वाचविण्याच्या नादात तो पलटी झाला. यामध्ये रस्ता ओलांडणारे सिद्धार्थ मुच्छंडी हे डंपरखाली सापडून गंभीर जखमी झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हा छेद रस्ता बॅरिगेट्स टाकून वाहने आणि प्रवाशांसाठी बंद करण्यात आलेला आहे. तरीही प्रवाशी दोन बॅरिगेट्समधील जागेतून रस्ता ओलांडतात.

छेद रस्त्यावरून अचानक वाहने व पादचारी रस्त्यावर येत असल्याने वाहन चालक जोरात ब्रेक मारतात. त्यामुळे या ठिकाणी  लहान मोठे अपघात होण्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. सदरचा छेद रस्ता कायमचा बंद करावा अशी सजग नागरिकांची मागणी आहे. तळेगाव दाभाडे प्राथमिक आरोग्य केंद्राचे प्रभारी वैद्यकीय अधिकारी जयेश बिरारी यांनी शव विच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भास्कर जाधव यांच्या मार्गर्शनाखाली अनिकेत हिवरकर करीत आहेत.

टॅग्स :Talegaon Dabhadeतळेगाव दाभाडे पोलीसPuneपुणेAccidentअपघातDeathमृत्यूPoliceपोलिस