लोणावळा : गॅस सिलिंडर टंचाईच्या पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील ग्रामीण भागात महाप्रसादासाठी पुन्हा पारंपरिक चुलींचा वापर वाढताना दिसत आहे. चैत्र महिन्यातील यात्रा, अखंड हरिनाम सप्ताह आणि भंडाऱ्यांच्या आयोजनासाठी ग्रामस्थांनी एकत्र येत जुनी पद्धत स्वीकारली आहे.
गॅस उपलब्ध न झाल्याने अनेक गावांमध्ये मोठ्या चुली (रहाळ) तयार करून लाकूडफाट्यावर स्वयंपाक केला जात आहे. महाप्रसादासाठी लागणारे अन्न मोठ्या प्रमाणात शिजवताना चुली हा पर्याय अधिक उपयोगी ठरत असल्याचे ग्रामस्थांचे मत आहे. पाटण गावातील एका ज्येष्ठ नागरिकाने सांगितले की, ‘पूर्वी सर्व धार्मिक कार्यक्रमांचा स्वयंपाक चुलीवरच होत असे. आता पुन्हा त्याच पद्धतीने महाप्रसाद तयार केला जात आहे. त्यामुळे जुन्या परंपरा जिवंत होत आहेत.’
चुलीवर स्वयंपाक करताना लाकूड गोळा करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागत असून, धुरामुळे महिलांना व स्वयंपाक करणाऱ्यांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या पद्धतीत वेळ अधिक लागतो. तरीही ग्रामस्थांनी एकोप्याने सर्व अडचणींवर मात केली आहे. महाप्रसादानिमित्ताने गावोगावी उत्साहाचे वातावरण असून, सामूहिक सहभागातून धार्मिक कार्यक्रम यशस्वीपणे पार पडत आहेत. गॅस टंचाईमुळे आलेल्या अडचणींना संधी मानत ग्रामीण भागात पारंपरिक चुलींचा पुनर्जन्म झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.
Web Summary : Gas cylinder shortages in Maval are driving a return to traditional chulhas (stoves) for preparing Mahaprasad during festivals. Despite challenges like smoke and time, villagers are united in reviving old customs, turning the crisis into an opportunity to celebrate community spirit.
Web Summary : मावल में गैस सिलेंडर की कमी के कारण त्योहारों के दौरान महाप्रसाद बनाने के लिए पारंपरिक चूल्हों का उपयोग बढ़ रहा है। धुएं और समय जैसी चुनौतियों के बावजूद, ग्रामीण पुरानी रीति-रिवाजों को पुनर्जीवित करने में एकजुट हैं, संकट को सामुदायिक भावना का जश्न मनाने के अवसर में बदल रहे हैं।