भोसरीच्या कुस्ती आखाड्यात यंदा भिडणार हिंद केसरी, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2025 11:10 IST2025-04-12T11:10:26+5:302025-04-12T11:10:46+5:30
कुस्तीच्या रोमहर्षक लढती पाहण्याची शौकिनांना संधी

भोसरीच्या कुस्ती आखाड्यात यंदा भिडणार हिंद केसरी, भारत केसरी, महाराष्ट्र केसरी
भोसरी : भोसरीचे ग्रामदैवत श्री भैरवनाथ महाराजांचा उत्सव दि. १५ व १६ एप्रिल रोजी साजरा करण्यात येत असून, बुधवारी (१६ एप्रिल) कै. सदाशिवराव रामभाऊ फुगे कुस्ती आखाड्यात 'भैरवनाथ केसरी' किताबासाठी भारत केसरी वीरेंद्र दहिया आणि महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांच्यात सामना होईल. मैदानात हिंद केसरी, भारत केसरीसारखे मल्ल झुंजणार आहेत.
भैरवनाथ महाराजांच्या उत्सवानिमित्त राज्य आणि देश पातळीवरील मल्ल यंदा आखाड्यात सहभागी होणार आहेत. हिंद केसरी, भारत केसरी, ऑल इंडिया चॅम्पियन, एशियन चॅम्पियनसह महाराष्ट्र केसरी मल्लांच्या कुस्त्या पाहण्याचा आनंद कुस्ती शौकिनांना घेता येणार आहे. विजेत्याला चांदीची गदा आणि १२ लाखापेक्षा अधिक रकमेच्या बक्षिसाने सन्मानित करण्यात येणार आहे.

भोजापूर केसरी किताबासाठी महाराष्ट्र केसरी, रुस्तुम-ए-हिंद सिकंदर शेख आणि हरियाणाचा हिंदकेसरी अभिषेक गुज्जर यांच्यात लढत होणार आहे. वस्ताद केसरीसाठी दादा शेळके आणि महाराष्ट्र केसरी शुभम शिंदनाळे यांच्यात लढत रंगणार आहे. नाथसाहेब केसरी किताबासाठी कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज पाटील आणि उपमहाराष्ट्र केसरी महेंद्र गायकवाड यांच्यात सामना होणार आहे.
महाराष्ट्र केसरी हर्षद सदगीर, प्रकाश बनकर, उपहिंदकेसरी तुषार डुबे, उपमहाराष्ट्र केसरी संदीप मोटे, ऑल इंडिया चॅम्पियन आकाश माने आणि एशियन चॅम्पियन संजय तनपुरे, महाराष्ट्र चॅम्पियन बाळू अपराध व हनुमंत पुरी यांच्यातील रोमहर्षक लढती पाहता येणार आहेत. मल्ल देवा थापा आणि हरियाणाचा पवन यांच्यातही लढत रंगणार आहे.
यांच्याही रंगणार लढती
शुभम थोरात विरुद्ध महेश कुंभार, अमित कंधारे विरुद्ध अक्षय पवार, सागर राऊत विरुद्ध मुन्ना हिंगे, योगेश तापकीर विरुद्ध केतन घारे, महेश जाधव विरुद्ध संकेत माने, युवराज खोपडे विरुद्ध आदित्य काळभोर, निखिल वाघ विरुद्ध अनिकेत मगर, स्वराज काळभोर विरुद्ध प्रज्योत टाकळीकर, अजिंक्य सांडभोर विरुद्ध यश नखाते, ओम नखाते विरुद्ध आर्यन मुळे, अभिषेक जाधव विरुद्ध ओंकार ढेकळे यांच्यात आकर्षक लढती होणार आहेत.
भैरवनाथ महाराज उत्सव कमिटीचे प्रमुख जंगल फुगे, मच्छिंद्र लांडगे, सुदाम माने, मदन गव्हाणे, विलास फुगे, नारायण गव्हाणे, माजी नगरसेवक नितीन लांडगे, पंडित गवळी, भानुदास फुगे, यांनी कुस्ती आखाडा, बैलगाडा घाटाची पाहणी केली.