पिंपरी : महिलेच्या उपचारांसाठी २० हजार रुपये घेणाऱ्या धर्मदाय रुग्णालयांमधील डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल, लवळे येथे ४ ते ९ एप्रिल दरम्यान ही घटना घडली.बावधन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रवीण वामनराव लोहोटे (वय ५५, रा. चंदन नगर, पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या डॉक्टरचे नाव आहे. दिलीप लकाप्पा शिवशरण (३८, रा. उत्तम नगर, पुणे) यांनी बुधवारी बावधन पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.फिर्यादीच्या चुलतीला पित्ताशयाचा त्रास होत होता. त्यामुळे तिला उपचारांसाठी सिम्बॉयसिस युनिव्हर्सिटी हॉस्पिटल, लवळे येथे दाखल केले. संबंधित हॉस्पिटल हे धर्मादाय असल्याने रुग्णाच्या उपचारांसाठी एक रुपयाही खर्च येत नाही, याची डॉक्टरला जाणीव होती. तुमच्या रुग्णाची परिस्थिती खूप नाजूक असून, तिच्यावर तत्काळ उपचार करावे लागतील. नाहीतर रुग्णाचे काही खरे नाही.
तसेच रुग्ण दगावू शकतो. रुग्णाला वाचवायचे असेल तर मला ऑपरेशनसाठी पैसे द्यावे लागतील. पैसे दिले तरच रुग्णावर उपचार करेल. नाहीतर उपचार करणार नाही, अशी भीती दाखवून डॉक्टरने २० हजार रुपये रोख घेऊन फसवणूक केली.