शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर रात्रीच हल्ला? नेतन्याहू यांच्या विमानाचं हवेत उड्डाण; ५० ठिकाणं अमेरिकेच्या हिटलिस्टवर
2
इराण-अमेरिका युद्धाची शक्यता? तेहरानच्या इशाऱ्यानंतर कतारमधील अमेरिकन हवाई तळ केले रिकामे
3
ट्रम्प यांच्या टॅरिफवर आज कोणताही निर्णय नाही, अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी दुसऱ्यांदा पुढे ढकलली
4
Daryl Mitchell च्या शतकासह यंगची 'विल पॉवर'! टीम इंडियावर पलटवार करत न्यूझीलंडनं साधला बरोबरीचा डाव
5
Daryl Mitchell Hundred : डॅरिल मिचेलची कडक सेंच्युरी; किंग कोहलीच 'नंबर वन' स्थान धोक्यात!
6
अमेरिकेने केली इराणची कोंडी, चारही बाजूंनी घेरले; 'या' देशांमध्ये लष्करी तळ...
7
हजारीबागमध्ये भीषण बॉम्ब ब्लास्ट, तिघांचा मृत्यू, एकजण गंभीर जखमी
8
अमेरिकेच्या टॅरिफ धोरणावर आज रात्री फैसला; ट्रम्प यांच्याविरोधात निकाल गेल्यास काय घडू शकतं?
9
शिंदेंच्या उमेदवाराच्या घरावर मतदानाआधी दगडफेक; खिडक्या फोडल्या, खुर्च्या तोडल्या, प्रचंड राडा
10
मैत्री मैत्रीच्या ठिकाणी...! युद्धात इराणला साथ देणार नाही चीन? कारण काय?
11
धक्कादायक ! नागपुरात बाप झाला सैतान,पत्नीकडे ताबा जाऊ नये म्हणून पोटच्या मुलीची हत्या
12
लहानपणीची गोंडस मुलगी आता झालीये सुपरहॉट, रेड बॅकलेस ड्रेसमध्ये सारा अर्जुनचा किलर लूक!
13
"JJD हा लालूंचा खरा पक्ष"; राजद विलीनीकरणावर तेजप्रताप यांची तेजस्वींना थेट ऑफर
14
Petrol कार्सच्या तुलनेत Diesel कार्स जास्त मायलेज का देतात? जाणून घ्या यामागील विज्ञान...
15
बांगलादेशचा आडमुठेपणा! भारतात टी-२० वर्ल्डकप खेळण्यास नकार; आता आयसीसीकडे आहेत ३ पर्याय!
16
IND vs NZ : हर्षित राणानं ऑफ स्टंप उडवत डेवॉन कॉन्वेचा केला करेक्ट कार्यक्रम! गंभीरने अशी दिली दाद
17
मुस्लिमबहुल प्रभागांत रंगणार काँग्रेस-एमआयएम सामना! १३ जागांसाठी काँग्रेसची धडपड, शिंदेसेना चारही जागा राखणार?
18
डोंबिवलीत भाजपा अन् शिंदेसेनेत जोरदार राडा; ५ जणांना अटक, जखमींवर रुग्णालयात उपचार
19
Video - ई-रिक्षातील तरुणाचं अश्लील कृत्य; रणरागिणीने रस्त्यावरच घडवली चांगलीच अद्दल
20
"विना परवाना शस्त्र वाटणार, ज्याला हवं त्याने..."; योगी सरकारच्या मंत्र्याचं धक्कादायक विधान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात प्रचार शिगेला..! नगरपरिषदेचा गड काबीज करण्यासाठी उमेदवारांसह नेत्यांनी कंबर कसली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2025 10:10 IST

  शेवटच्या टप्प्यात प्रभाग पिंजून काढण्यासाठी उमेदवारांची धावाधाव

- राहुल गणगे

पुणे : जिल्ह्यातील आळंदी, बारामती, भोर, चाकण, दौंड, फुरसुंगी-उरुळी देवाची, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, लोणावळा, राजगुरूनगर, सासवड, शिरूर, तळेगाव दाभाडे, वडगाव नगरपरिषदा, तर देहू, मंचर व माळेगाव या नगरपंचायतींसाठी प्रचार शिगेला पोहोचला आहे. तर कार्यकर्त्यांकडूनही तुफान आलंया म्हणत आमच्या भाऊलाच पाठीशी राहण्याचे आवाहन केले जात आहे. यंदा प्रचारासाठी अत्यंत कमी वेळ मिळाला आहे. २ डिसेंबरला मतदान पार पडणार आहे.

त्यामुळे उमेदवारांना आता प्रचारासाठी केवळ तीनच दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे चार दिवसांत संपूर्ण प्रभाग पिंजून काढण्याचे आव्हान उमेदवारांपुढे आहे. शहरातील प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी धावाधाव करीत आहेत; परंतु प्रचारासाठी मिळालेल्या कमी वेळेत आपली चुणूक दाखवत कोण बाजी मारणार? अशी चर्चा सध्या सुरू आहे. वरिष्ठ नेत्यांनीही प्रभागात सभा घेत नगरपरिषदेचा गड काबीज करण्यासाठी दिवसरात्र कंबर कसली आहे.

सासवडमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

सासवड नगरपरिषदेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना (शिंदेसेना), शिवसेना (उद्धवसेना) या राजकीय पक्षांतच लढत होत आहे. सासवड नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जोरदार सुरू झाल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसचा हात, तुतारीचा आवाज की, घड्याळाची टिकटिक वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अवघ्या चार दिवसांवर मतदान येऊन ठेपल्यामुळे नगरपरिषद निवडणुकीतील दोन पॅनलच्या उमेदवार व कार्यकर्त्यांची अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याची धांदल सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलविरुद्ध भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट, शिवसेनेच्या शिंदेसेना आणि इतर लहान-मोठ्या पक्षांनी एकत्र येऊन उभारलेल्या कृष्णा-भीमा विकास आघाडी पॅनलमधील सरळ सामना सुरू आहे. दौंड नगरपरिषदेच्या निवडणुकीची प्रचार रणधुमाळी जोरात सुरू आहे. या निवडणुकीत नागरिक हित संरक्षण मंडळ आणि त्यांचे मित्रपक्ष तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार यांचा गट) आणि त्यांच्या मित्रपक्षांमध्ये थेट लढत होत आहे. निवडणूक शांत आणि सुसंवादाने होत आहे.

चाकणकर हैराण, बारामतीत राजकीय समीकरणे बदलली

चाकण नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचाराला जोर लागला असून विविध पक्ष आणि अपक्ष उमेदवारांच्या प्रचार वाहनांवरील स्पीकरमधून होणाऱ्या कर्कश आवाजामुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. राजगुरूनगर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी चुरशीची चौरंगी लढत होणार आहे. नगराध्यक्षपदासाठी भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी आणि शिवसेना (उद्धवसेना) यांच्या गटांमधील खरी लढत रंगणार आहे. बारामती नगरपरिषदेचे मतदान फक्त चार दिवसांवर आहे.

त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी सर्व प्रमुख पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते अपार मेहनत घेत आहेत. बारामतीत पवार कुटुंब आणि पक्षामध्ये फूट झाल्यामुळे येथील राजकीय समीकरणे बदलली आहेत. एकेकाळी हातात हात घालून काम करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते आता विभागले गेले आहेत. तर, कट्टर राजकीय विरोधक असलेला भाजप राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा मित्रपक्ष बनला आहे.

आळंदीत चुरस, मंचरमध्ये सभांचा धडाका

आळंदीतील नगरपरिषद निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. नगराध्यक्षपदापासून ते सदस्यपदापर्यंत प्रमुख राजकीय पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी कंबर कसल्यामुळे मतदारांसमोर अनेक पर्याय आले आहेत. विशेषतः भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्यात थेट लढत पाहायला मिळत असून, शिवसेना (शिंदेसेना) आणि शिवसेना (उद्धवसेना) यांचे उमेदवारही काही प्रभागांमध्ये निर्णायक भूमिका बजावताना दिसत आहेत. दुसरीकडे या निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट आणि मनसेने कोणतीही जागा लढवली नाही. मंचर नगरपंचायतीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे यांची सभा घेत प्रचाराचा धडाका लावला आहे.

आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

भोर शहरात निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहोचला असून, आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठाही प्रश्नात आली आहे. दोन्ही पक्षांकडून घरोघरी जाऊन प्रचार केले जात असून आरोप-प्रत्यारोपांमुळे निवडणुकीतील उत्साह वाढला आहे. भोर नगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट यांच्यात मुख्य लढत सुरू आहे. याशिवाय, दोन ठिकाणी शिवसेना आणि एका ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार तसेच सहा अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातारण ढवळून निघाले आहे. निवडणुकीच्या रिंगणात अपक्षांनी उडी घेत खरी रंगत आणली आहे. सर्वच ठिकाणी सर्व प्रमुख पक्षांच्या उमेदवारांत सामना रंगला आहे; परंतु निवडणूक निकालानंतरच जिल्ह्यात कोणी किती नगरपरिषदांवर आपला झेंडा फडकविला आहे, हे स्पष्ट होणार आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Local Elections: Intense campaigning as leaders vie for council control.

Web Summary : Maharashtra local elections see fierce campaigning. Parties clash in Alandi, Baramati, Bhor, and Chakan. Political equations shift in Baramati. Leaders focus on securing Nagar Parishad wins as the election nears.
टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकLocal Body Electionस्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकZilla Parishad Electionजिल्हा परिषद निवडणूकPMC Electionsपुणे महापालिका निवडणूक २०२५