पिंपरी : खासगी बसमधून अफू व गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एकास पोलिसांनी अटक केली. संशयितांकडून २८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. ही कारवाई ४ फेब्रुवारी रोजी रावेत परिसरात करण्यात आली. श्रवणलाल वहादुरराम देवासी (३६, मूळ रा. पाली, राजस्थान; सध्या रा. पुणे) याला अटक करण्यात आली आहे. तो बसचालक आहे. त्याच्यासह धनराज चौधरी आणि विनोद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमली पदार्थविरोधी पथकातील पोलिस कॉन्स्टेबल सदानंद रुद्राक्षे यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. रावेत येथे खासगी बसमधून गुटखा वाहतूक केली जात असल्याची माहिती अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार सापळा लावून बसची पाहणी केली. त्यामध्ये ४४९.५७ ग्रॅम अफू आणि प्रतिबंधित गुटखा आढळून आला.
पोलिसांनी २८ लाख पाच हजार ६८५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. बसचालक श्रवणलाल याच्याकडे चौकशी केली असता, त्याने अफू हे धनराज चौधरी याने दिले असून ते पुणे येथे पोहोचवायचे आहे, तर गुटखा राजस्थान येथील ट्रॅव्हल्स कार्यालयातून दिला असून तो विनोद नावाच्या व्यक्तीला द्यायचा असल्याचे सांगितले. त्यानुसार पोलिसांनी अन्य दोघांवर देखील गुन्हे दाखल केले आहेत.
Web Summary : Police in Ravet, Pune, arrested a bus driver transporting opium and gutka. ₹28 lakh worth of contraband was seized. Two others are implicated.
Web Summary : पुणे के रावेत में पुलिस ने अफीम और गुटखा ले जा रहे एक बस चालक को गिरफ्तार किया। ₹28 लाख का माल जब्त किया गया। दो अन्य लोग भी शामिल।